Inflamed heart symptoms: हृदयाला सूज आल्यावर शरीरात दिसतात हे मोठे बदल; लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे धाव घ्या

Swelling in heart causes and treatment: जेव्हा हृदयाला सूज येते तेव्हा शरीरात अनेक लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे अनेकदा सामान्य आजारांसारखी वाटतात, पण ती गंभीर असू शकतात. ही लक्षणे दिसताच लगेच डॉक्टरांकडे धाव घेणे खूप महत्त्वाचे आहे.
Inflamed heart symptoms
Inflamed heart symptomssaam tv
Published On

हृदयात सूज येणं ही एक गंभीर समस्या मानली जाते. मात्र या समस्येकडे सामान्यपणे दुर्लक्षित केलं जातं. वैद्यकीय भाषेत याला ‘मायोकार्डायटिस’ म्हणजे हृदयाच्या स्नायूंमध्ये सूज येणं असं म्हणतात. काही वेळा ही सूज हृदयाच्या बाहेरील आवरणावर देखील येऊ शकते. ही समस्या कोणत्याही वयात होऊ शकते आणि वेळेवर लक्ष दिलं नाही, तर जीवघेणीही ठरू शकते.

हृदयाच्या स्नायूंना सूज का येते?

हृदयात सूज येण्याची मुख्य कारणं म्हणजे व्हायरल इन्फेक्शन, फ्लू, कोविड-१९ अशी असू शकतात. सामान्यपणे ही सूज हृदयाच्या पंपिंग क्षमतेवर परिणाम करते आणि शरीरात योग्य प्रमाणात रक्त पोहोचणं अवघड होतं.

Inflamed heart symptoms
Avoid death heart attack: हार्ट अटॅक आल्यानंतर २ मिनिटांच्या आत करा 'हे' काम; डॉ.छाजेर यांनी सांगितला मृत्यूला टाळण्याचा उपाय

हृदयाला सूज आल्यावर दिसून येणारी लक्षणं

  • छातीत दुखणं किंवा जडपणा वाटणं

  • श्वास घेण्यास त्रास होणं

  • कोणतीही कामं न करता अत्यंत थकवा जाणवणं

  • हृदयाची धडधड वाढणं किंवा अनियमित होणं

  • पायांमध्ये विशेषतः गुडघ्याच्या खाली सूज येणं

  • डोळ्यासमोर अंधारी येणं किंवा चक्कर येणं

  • हळूहळू ताप येणं

लोकं सामान्यपणे या लक्षणांकडे बहुतेक वेळा दुर्लक्ष करतात. जातं कारण त्यातील अनेक लक्षणं अपचन, गॅस, किंवा एंग्जायटीसारखीच असतात. मात्र सतत ही लक्षणं जाणवत असतील तर ती हृदयाला सूज येण्याचं लक्षण असतं.

Inflamed heart symptoms
Heart attack sleep: हार्ट अटॅक झोपेत असतानाच का येतो? 'या' चुका टाळून जीव वाचवा

हृदयाला सूज आल्यावर काय उपाय करावेत?

  • सर्दी, फ्लू किंवा इन्फेक्शन असलेल्या व्यक्तींशी अंतर ठेवा

  • फ्लू आणि कोव्हिड लस वेळेवर घ्या

  • संतुलित आहार घ्या

  • नियमित व्यायाम करा आणि झोप पूर्ण घ्या

  • धूम्रपान, मद्यपान आणि इतर व्यसनांपासून दूर राहा

  • छातीत दुखणं, थकवा, धडधड वाढणं – या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या

  • तणाव कमी ठेवण्यासाठी योग करा

Inflamed heart symptoms
Bone cancer symptoms : हाडांचा कॅन्सर झाल्यावर शरीरात होतात ४ मोठे बदल; दुर्लक्ष करणं पडेल महागात

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com