Surabhi Jayashree Jagdish
स्वयंपाक करताना आपल्यापैकी अनेक घरातील भाज्यांमध्ये साखरेचा वापर केला जातो.
काही भाज्यांमध्ये चिमूटभर साखर घातल्यास त्यांची चव खरोखरच वाढते.
साखर पदार्थांमधील आंबटपणा किंवा कडू चव संतुलित करण्यास मदत करते आणि इतर चवींना अधिक उठून दिसण्यास मदत करते.
टोमॅटो नैसर्गिकरित्या थोडे आंबट असतो. टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये, सूपमध्ये किंवा टोमॅटो वापरलेल्या कोणत्याही भाजीमध्ये चिमूटभर साखर घातल्याने त्याचा आंबटपणा कमी होतो.
काही पालेभाज्यांमध्ये किंचित कडवटपणा असतो. अशा भाज्यांमध्ये थोडी साखर घातल्यास त्यांचा कडवटपणा कमी होतो आणि भाजीची चव अधिक स्वादिष्ट लागते.
ज्या भाज्यांमध्ये नैसर्गिक कडवटपणा असतो, जसं की कारलं किंवा काहीवेळा भोपळा. यामध्ये थोडी साखर घातल्याने कडवटपणा कमी होतो आणि इतर मसालेदार चवी अधिक चांगल्या प्रकारे येतात.
कोबी आणि फ्लॉवरसारख्या भाज्यांमध्ये थोडी साखर घातल्याने त्यांची नैसर्गिक गोडसर चव येते आणि भाजी अधिक चवदार लागते.