High Blood Pressure: औषधांशिवाय घरीच ठीक होईल हाय ब्लड प्रेशरची समस्या; डॉक्टरकडे जाण्याआधी ट्राय करा घरगुती उपाय

How to Control High Blood Pressure Without Medicine: उच्च रक्तदाब ही आजच्या काळातील सर्वात सामान्य आरोग्य समस्या आहे. योग्य जीवनशैली आणि घरगुती उपाय अवलंबल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो.
India diabetes high blood pressure warning
India diabetes high blood pressure warningsaam tv
Published On

तुम्हालाही हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे का? तुम्हीही रक्तदाब वाढला की लेगच डॉक्टरकडे धाव घेता का? जर असं असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बाब आम्ही सांगणार आहोत. हाय ब्लड प्रेशरवर औषधोपचार हा नेहमीच एकमेव उपचार नसतो. जर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल ठेवली तर तुमतं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकतं.

बर्‍याच प्रकरणांमध्ये औषधांची गरज टाळता येते किंवा कमी करता येते. चांगल्या सवयी केवळ हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करत नाहीत तर ते स्थिर ठेवण्यास देखील मदत करतात. मेयोक्लिनिक या हेल्थ वेबसाईटच्या मते, घरी तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे काही सोपे मार्ग आहेत.

India diabetes high blood pressure warning
Heart Attack: औषधांशिवायही टाळू शकता हार्ट अटॅकचा धोका; 4 सोप्या टीप्सचा करा वापर

वजन कमी करा

वजन वाढत असताना रक्तदाब देखील वाढतो. जास्त वजनामुळे स्लीप एप्नियासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. ज्यामुळे रक्तदाब आणखी वाढण्याचा धोका असतो. चांगली बाब म्हणजे थोडेसं वजन कमी केल्याने देखील रक्तदाब सुधारण्यास मदत होते. पोटाभोवती चरबी वाढण्याने देखील रक्तदाब वाढतो.

नियमित पद्धतीने व्यायाम केला

दररोज फक्त ३० मिनिटं हल्का ते मध्यम व्यायाम करा. यामध्ये वेगाने पायी चालणं, सायकलिंग, पोहणं किंवा डान्स या गोष्टी रक्तदाब कमी करू शकतात. नियमित शारीरिक हालचाली केवळ उच्च रक्तदाब कमी करत नाहीत तर तो पुन्हा वाढण्यापासून देखील रोखतात.

India diabetes high blood pressure warning
What do you know about Mumbai? : शहर एक नावं अनेक! नवी मुंबई ते ग्रेटर मुंबई आणि सब अर्बन मुंबई यांमध्ये फरक काय?

हेल्दी डाएट

धान्य, फळं, भाज्या आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा. यामुळे रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रित होण्यास मदत होते. केळी, पालक आणि मसूर यांसारखे पदार्थ आणि रक्तदाब चांगला राखण्यास मदत करतात.

प्रोसेस्ड फूड कमी करा

जास्त प्रमाणात मीठ सेवन हे उच्च रक्तदाबाचं एक प्रमुख कारण मानलं जातं. पॅक केलेल्या आणि प्रोसेस्ड अन्नपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात सोडियम असतं. त्यामुळे हे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. त्यामुळे स्वयंपाक करताना मीठाचं सेवन मर्यादित करावं.

India diabetes high blood pressure warning
Breast Cancer: नाईट शिफ्ट, नियमित प्रवास ठरू शकतो गंभीर आजाराला निमंत्रण, ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता

दारू आणि सिगारेटपासून दूर राहा

जास्त प्रमाणात दारूचं सेवन केल्याने ब्लड प्रेशर वाढू शकचं. त्याचप्रमाणे धूम्रपानामुळे रक्तदाब तात्काळ वाढू शकतो. या सवयी सोडल्यास हृदयाचे आरोग्य सुधारू शकतं.

तणावाकडे दुर्लक्ष करू नका

सतत कमी झोप आणि जास्त ताण यामुळे देखील उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दररोज ७ ते ८ तास झोप घ्या आणि ताण कमी करा.

India diabetes high blood pressure warning
Cancer Risk: दिवसभरातील तुमच्या या सवयी वाढवतायत कॅन्सरचा धोका; पाहा कोणत्या गोष्टी तुम्ही टाळू शकता

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com