Breast Cancer: नाईट शिफ्ट, नियमित प्रवास ठरू शकतो गंभीर आजाराला निमंत्रण, ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता

Night shifts travel breast cancer risk: आधुनिक जीवनशैलीत नाईट शिफ्ट आणि सततचा प्रवास ही अनेकांसाठी अपरिहार्य गोष्ट झाली आहे. मात्र वैद्यकीय संशोधनानुसार अशा जीवनशैलीमुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो.
Breast Cancer
Breast CancerSaam TV
Published On

महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चुकीची जीवनशैली यामागील एक प्रमुख कारण आहे. मात्र सततची नाईट शिफ्ट तसंच नियमित प्रवासही ब्रेस्ट कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकते असं नव्या संशोधनातून समोर आलं आहे. Texas A&M University College of Arts and Sciences मधील संशोधकांच्या मते, हे नेमकं कसं आणि का घडतं हे अजून समजलेलं नाही. पण हा जीवघेणा आजार शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम करतो.

डॉ. तापस्री रॉय यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आलं असून Oncology या जर्नलमध्ये स्टडी पब्लिश झाला आहे. यामध्ये असं दिसून आलंय की, सर्केडियन रिदममध्ये व्यत्यय आला की, ब्रेस्टमधील टिश्यूंची रचना बदलते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.

Breast Cancer
Heart Attack Symptom: हार्ट अटॅकची लक्षणे जावणवतायेत? हा १ पदार्थ चघळा वाचेल तुमचे आयुष्य, तज्ज्ञांनी दिला सल्ला

Texas A&M University मधील सेंटर फॉर स्टॅस्टेस्टिकल बायोमेट्रिक्सचे को-डायरेक्टर सरकार यांनी सांगितलं की, “कॅन्सर हा वेळ पाळतो. जर तुमचे internal clock बिघडलं की कॅन्सर त्याचा फायदा घेतो. पण आता आम्ही त्याला रोखण्याचा नवीन मार्ग शोधलाय.

सर्केडियन रिदम आणि कॅन्सर यांचा संबंध

सर्केडियन रिदम म्हणजे शरीराचे नैसर्गिक २४ तासांचं internal clock. यामध्ये झोप-जागरणाचं चक्र, हार्मोन्सचं रिलीज होणं, शरीराचं तापमान आणि इतर कामांवर नियंत्रण आणतो. प्रकाश आणि अंधार यानुसार हे घड्याळ काम करतं.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, “जेव्हा हे रिदम बिघडतं तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत धोकादायक ठरू शकतात.

Breast Cancer
Heart Attack Symptom: हार्ट अटॅकची लक्षणे जावणवतायेत? हा १ पदार्थ चघळा वाचेल तुमचे आयुष्य, तज्ज्ञांनी दिला सल्ला

हा अभ्यास कसा केला गेला?

कॅन्सर आणि झोपेच्या कमतरतेतील संबंध शोधण्यासाठी संशोधकांनी दोन गटांचा वापर केला. हे ग्रुप जेनेटीकदृष्टा ब्रेस्ट कॅन्सर विकसित करण्यासाठी तयार केला होता. यावेळी एका गटाला सामान्य दिवस-रात्र या चक्रामध्ये ठेवलं गेलं. तर दुसऱ्या गटाला अशा चक्रात ठेवलं ज्यामुळे त्यांचं internal clock बिघडलं.

यामधून काय समोर आलं?

निष्कर्षांनुसार, सामान्य गटात २० आठवड्यांनंतर कॅन्सर दिसून आला. तर दुसऱ्या गटात १८ आठवड्यांतच कॅन्सरची लक्षणं दिसून आली. झोपेच्या कमतरतेमुळे झालेल्या गटातील ट्यूमरमध्ये वाढ दिसून आली. यामध्ये इतकी वाढ झाली होती की, ते फुफ्फुसांपर्यंत पसरू शकले.

Breast Cancer
Symptoms of Heart Attack: महिनाभर आधीच दिसतात हार्ट अटॅक लक्षणं, या ५ संकेताकडे दुर्लक्ष करू नका

सरकार यांनी पुढे सांगितलं की, फक्त ट्यूमर वेगाने वाढला असं नाही. तर रोगप्रतिकारक शक्तीवर याचा परिणाम दिसून आला. ज्यामुळे कॅन्सरच्या पेशींना जगण्यासाठी आणि पसरण्यासाठी अधिक अनुकूल परिस्थिती मिळाली.

Breast Cancer
Heart attack symptoms: सकाळी बेडवरून उठताच ही ६ लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे; वेळीच डॉक्टरांची घ्या मदत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com