Liver Cancer Symptoms: शरीरात हे ४ बदल दिसले तर समजा लिव्हरच्या कॅन्सर झालाय; दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी जीवघेणं

Early Symptoms Of Liver Cancer You Should Not Ignore: लिव्हरचा कॅन्सर हा गंभीर आजार असून त्याची लक्षणं सुरुवातीला सूक्ष्म स्वरूपात दिसतात. डॉक्टरांच्या मते शरीरात काही बदल दिसल्यास तातडीने तपासणी करणं आवश्यक आहे.
Symptoms of liver cancer
Symptoms of liver cancersaam tv
Published On

आजकाल आपल्या आहारात अनेक तळलेले पदार्थ असतात. मात्र तुम्ही चवीसाठी खात असलेल्या खाद्यपदार्थांचा तुमच्या लिव्हरवर परिणाम होत असतो. अयोग्य जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि हिपेटायटीस सारख्या इन्फेक्शनमुळे यकृताच्या कॅन्सरचं प्रमाण झपाट्याने वाढताना दिसतंय.

यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे लोकं लिव्हरच्या कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. या समस्येला एक सामान्य समस्या मानतात. यामुळे कॅन्सरचं गंभीर स्वरूपात निदान होतं. याची सुरुवातीची लक्षणं काय आहेत ते पाहूयात.

मेयो क्लिनिकच्या मते, लिव्हरच्या कॅन्सरची अनेक लक्षणं असू शकतात. मात्र याची ४ लक्षणं अशी आहेत जी तुम्ही ओळखू शकता

वेदना आणि सूज

जर तुम्हाला तुमच्या पोटाच्या उजव्या बाजूला विशेषतः बरगड्यांच्या खाली सतत सौम्य वेदना, दाब किंवा सूज येत असेल तर त्याला गॅस किंवा आम्लता समजून दुर्लक्ष करू नका. ही वेदना तेव्हा होते जेव्हा लिव्हरमध्ये ट्यूमरमुळे मोठा होतो. अशावेली पोटात द्रव जमा झाल्यामुळे वेदना जाणवतात.

Symptoms of liver cancer
High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

वजन कमी होणं

जर तुमचं वजन कोणतंही डाएट किंवा व्यायामाशिवाय कमी होत असेल तर आणि तुमची भूक कमी होत असेल तर ही एक धोक्याची घंटा असू शकते. लिव्हरचा कॅन्सर शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर परिणाम करतो. अशात जर एखाद्या व्यक्तीला लवकर पोट भरल्यासारखं वाटतं असेल आणि भूक कमी लागतं असेल तर डॉक्टरांची मदत घ्यावी.

कावीळ

कावीळ हे लिव्हरच्या कॅन्सरचं एक प्रमुख लक्षण मानण्यात येतं. त्यामुळे त्वचा, डोळ्यांचा पांढरा भाग आणि नखं पिवळी पडतात. ज्यावेळी लिव्हर योग्यरित्या काम करत नाही आणि रक्तातील बिलीरुबिनची पातळी वाढते तेव्हा हा बदल पाहायला मिळतो. गडद पिवळा किंवा तपकिरी लघवी आणि फिकट रंगाचा मल ही देखील कावीळी लक्षणं आहेत.

Symptoms of liver cancer
High Blood Pressure: हाय BP कंट्रोलमध्ये ठेवायचंय? मग सकाळीच 'हा' ज्यूस प्या, काहीच दिवसांत मिळेल आराम

सततचा थकवा

जर तुम्हाला हलक्या कामानंतरही सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल आणि विश्रांती घेतल्यानेही तो बरा होत नसेल तर याकडे गांभीर्याने पाहावं लागणार आहे. लिव्हरच्या कॅन्सरमुळे शरीराची ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता कमी होते. अशावेळी तुम्हाला सतत थकवा जाणवतो.

Symptoms of liver cancer
High Blood Pressure: औषधांशिवाय घरीच ठीक होईल हाय ब्लड प्रेशरची समस्या; डॉक्टरकडे जाण्याआधी ट्राय करा घरगुती उपाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com