High Blood Pressure: हाय BP कंट्रोलमध्ये ठेवायचंय? मग सकाळीच 'हा' ज्यूस प्या, काहीच दिवसांत मिळेल आराम

BP Control: हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी काही नैसर्गिक ज्यूस फायदेशीर ठरू शकतात. योग्य आहार, जीवनशैली आणि डॉक्टरांचा सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे.
Morning Juices for BP
High Blood Pressure Controlgoogle
Published On

सध्या तरुणांना कमी वयातच अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजाराने त्यांचा जागीच मृत्यू होत आहे. याचं कारण म्हणजे बदलती लाइस्टाइल आणि दुर्लिक्षित करणारी लक्षणे आहे. त्यातच हाय ब्लड प्रेशर म्हणजेच हायपरटेन्शन हा आजार जगभरातील कोट्यवधी लोकांना त्रास देत आहे. याची कोणतीही ठळक लक्षणं दिसत नाहीत. म्हणून हा आजार झाल्याचं खूप उशीरा कळतं.

जर वेळेवर उपचार केले नाहीत तर हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकसारख्या जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. औषधं, संतुलित आहार आणि जीवनशैलीतले बदल यासोबतच काही सकाळी सेवन केलेले ज्यूस रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. मात्र, हे ज्यूस औषधांचा पर्याय नाहीत तर घरगुती हेल्दी राहण्याचे उपाय आहेत, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

Morning Juices for BP
Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला गोड पदार्थ करताय? मग गुलगुल्यांची पारंपारिक रेसिपी वाचाच

जास्वंदचा चहा

जास्वंदचा चहा लालसर रंगाचा असतो. जो चांगल्या निरोगी गुणधर्मांसाठी लोक सेवन करतात. या चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तवाहिन्या सैल करायला मदत करतात. तज्ज्ञांच्या संशोधनानुसार, रोजच्या रोज दिवसातून दोन कप जास्वंदाचा चहा घेतल्याने कमी उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही रक्तदाब कमी होऊ शकतो.

टोमॅटो ज्यूस

टोमॅटोच्या ज्यूसमध्ये पोटॅशियम, जीवनसत्त्वे आणि लाइकोपीनसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात. काही आठवडे रोज टोमॅटो ज्यूस सेवन केल्याने प्री-हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये रक्तदाब कमी झाल्याचा फरक दिसतो.

डाळिंबाचा रस

डाळिंबाचा रस अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्स युक्त असतो. हे घटक रक्तवाहिन्यांच्या आतल्या थराचे संरक्षण करतात आणि रक्तप्रवाह सुधारण्यासाठी मदत करतात. रोज डाळिंबाचा रस घेतल्याने सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब दोन्ही कमी होऊ शकतो.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये कॅटेचिन्स नावाचे अँटिऑक्सिडंट्स असतात. याने रक्तवाहिन्यांचे आरोग्य व्यवस्थित ठेवतात आणि खराब कोलेस्टेरॉल कमी करतात. नियमित ग्रीन टी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि धमन्यांवर होणारा ताण कमी होतो.

टीप: हा लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने आहे. कोणताही उपाय सुरू करण्यापूर्वी किंवा औषधांमध्ये बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Morning Juices for BP
Vitamin B12च्या कमतरेचं कारण काय? या ३ चुका आत्ताच टाळा, अन्यथा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com