Sakshi Sunil Jadhav
संक्रांतीला प्रत्येक घरामध्ये काहीतरी गोडाचा पदार्थ केला जातो. पण गृहीणींना कमी वेळ असेल तर हे गुलगुले एकदा नक्कीच बनवा. त्याने वेळ आणि मेहनत दोन्हीही तुलनेनं कमी होईल.
१ कप गव्हाचं पीठ, अर्धी वाटी साखर, अर्धा चमचा वेलची पूड, १ पिकलेलं केळ, पाणी आणि तेल इ.
सगळ्यात आधी तुम्हाला हे साहित्य एकत्र आणून ठेवावे लागेल याने तुमचा वेळ आणि मेहनत कमी होईल.
सर्वप्रथम एका भांड्यात पाणी ओता आणि साखरेचा पाक तयार करा. नेहमी मिठायांसाठी जो पाक तयार करता. त्याच प्रकारे हा पाक तयार करा.
आता पाक थंड झाल्यावर त्यात पीठ, वेलची पूड, मॅश केलेलं केळं घालून बॅटर तयार करा. बॅटर डोश्याच्या किंवा इडली पीठापेक्षा थोडं जास्त घट्ट ठेवा.
आता बॅटरला विश्रांती न देता लगेचच तेल गरम करायला ठेवा. गॅसचा फ्लेम स्लोच ठेवा.
गरम तेलात एक चमचा पीठ टाका आणि सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करा. फक्त हे गुलगुली जळू देऊ नका.
गुलगुले तयार झाल्यावर एका टिश्यू पेपरवर काढून ठेवा. त्याने तेलकटपणा कमी होईल.
तयार आहे तुमची मकर संक्रात स्पेशल डीश. तुम्ही चहासोबत हा पदार्थ खाऊ शकता.