High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

Best Diet Tips For Hypertension And Kidney Care : उच्चरक्तदाब आणि किडनीचे आजार टाळायचे असतील तर आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करणे उपयुक्त ठरू शकते.
Eat fruits and vegetables to control high blood pressure naturally
Eat fruits and vegetables to control high blood pressure naturallyFreepik
Published On

सध्याची मानवी जीवनशैली जितकी विकसीत झाली आहे तितकीच विस्खळीतही झाली आहे. कालांतराने माणसाच्या राहणीमानात विशेषत: खाण्याच्या पद्धतींमध्ये बदल झाले आहेत. पौष्टिक खाण्याऐवजी मोठ्या प्रमाणात जंक फूड खाल्ले जात आहे. त्यामध्ये वापरले जाणारे पदार्थ शरिरासाठी हानिकारक असू शकतात. यामुळे उच्च रक्तदाबासारखे गंभीर आजार उद्धभवू शकतात. यापासून वाचण्यासाठी तुम्ही योग्य आहार घेणे आवश्यक आहे.

Eat fruits and vegetables to control high blood pressure naturally
Woman Health Care :प्रत्येक महिलेने हे ५ सूपरफूड खायलाच हवेत, वाचा काय काय फायदे होतील

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगभरात साधारणत: ३० ते ७९ वयाोगटातील १.२ अब्ज लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि किडनीचे आजार होण्याची शक्यता असते. जास्त मीठ, साखर किंवा चरबीयुक्त पादर्थांचे सेवन केल्यास, जास्त वजन, लठ्ठपणा तसेच अतिप्रमाणात धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाच्या समस्येचा धोका अधिक प्रमाणात असतो. अनेक अशा भाज्या आणि फळे आहेत जे तुम्हाला हा धोका टाळण्यास मदत करू शकतात.

पालक, मेथी, कोथिंबीर, ब्रोकोली, टोमॅटो, लसूण या सर्व भाज्या नायट्रेट्स, व्हिटॅमिन सी, फायबर आणि पोटॅशियमने भरपूर असतात. जे रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. शिवाय केळी, सफरचंद, टरबूज, डाळिंब आणि संत्री यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये मोठ्याप्रमाणात अँटीऑक्सिडंट्सचा समावेश असतो. जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरतात. तुमच्या आहारात यासगळ्या गोष्टींचा समावेश असल्यास तुम्हाला उच्च रक्तदाब होण्याची शक्यता खुप कमी होऊ शकते.

Eat fruits and vegetables to control high blood pressure naturally
Night Thirst: रात्री झोपेतून उठून वारंवार पाणी पिताय? तुम्हाला आजार तर नाही ना? वाचा

सोबतच ओट्स, शेंगा आणि संपूर्ण धान्यांचे सेवन देखील तुमच्या शरिराला पुरेसे फायबर आणि पोटॅशियम देतं. योग्य आहारासह शरिराला नियमित व्यायाम आणि चांगल्या मानसिक आरोग्याचीही गरज भासते. त्यामुळे प्रत्येकाने दिवसातून किमान अर्धा तास तरी व्यायाम कारायलाच हवा. शिवाय मानसिक आरोग्यासाठी योग धारणा आणि मुख्य म्हणजे ७ ते ८ तासाची झोप घेणे महत्त्वाचे ठरते.

Eat fruits and vegetables to control high blood pressure naturally
Kidney Problems Signs : डोळ्यात ही लक्षणं दिसतायंत? किडनीला धोका तर नाही!

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com