Viral Video: तंबाखू खाणार का? माकडाला खाऊ खातला मळलेला तंबाखू, माकडाच्या हटके करामतीचा व्हिडीओ व्हायरल

Monkey eats tobacco video viral: सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये माकड तंबाखू खाताना दिसत आहे. लोकांनी हा व्हिडिओ पाहून आश्चर्य व्यक्त केले असून तो काही तासांतच ट्रेंडिंगमध्ये आला आहे.
Monkey eats tobacco video viral
Monkey eats tobacco video viralSAAM TV
Published On

सोशल मीडिया ही एक अशी जागा आहे, जिथे अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. यामध्ये चांगल्या घटना, विचित्र घटना, मजेशीर व्हिडीओ यांचा समावेश असतो. कधी कधी हे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की त्यामध्ये असलेल्या व्यक्तीही प्रचंड फेसम होतात. असाच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक व्यक्ती माकडाला तंबाखू खाणार का असं विचारतोय. गमतीची गोष्ट म्हणजे या व्हिडीयोमध्ये त्या माकडाने तंबाखू खाल्ला देखील आहे. या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ते पाहूयात.

Monkey eats tobacco video viral
Viral Vdeo: 5 रूपयाचं पेट्रोल भरा...! पेट्रोल पंपवर आलेल्या बाईकस्वाराची अजब मागणी; पाहा कर्मचाऱ्यांनी काय केलं?

सोशल मीडियावर व्हायरल झालाय व्हिडीओ

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये एका माकडासमोर एक माणूस उभा आहे. व्हिडिओमध्ये एक माणूस माकडासह दिसतोय. तो माणूस हातात तंबाखू मळताना दिसतोय. काही वेळाने तो जवळ बसलेल्या माकडाला तंबाखू खाणार का असं विचारतो.

Monkey eats tobacco video viral
Viral Video: शेवटी बापाचं काळीज! मुलीच्या भवितव्यासाठी वडिलांची धडपड, सोबत घेऊन चालवतो रिक्षा; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

या व्यक्तीने विचारल्यानंतर सुरुवातीला ते माकड नकार देतं. मात्र नंतर ते माकड स्वतःच्या हाताने तंबाखू खाताना दिसतंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने चांगलाच व्हायरल झाला असून अनेक लोकांनी यावर कमेंट देखील केलीये.

Monkey eats tobacco video viral
Viral Video: नवरा गर्लफ्रेंडसोबत शॉपिंग करत होता, बायको अचानक पोहोचली, मॉलमध्येच झिंज्या धरून फ्री स्टाइल हाणामारी

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @paswan_03_007 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलाय. या व्हिडीओला अनेकांनी लाईक केलं आहे. तर या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'बिहारमध्ये काहीही घडू शकतं.' तर एका युजरने यावर खैनी प्रेम अशीही कमेंट केलीये. तर अजून एका व्यक्तीने कमेंट केलीये की, उजव्या हाताने दिल्यानंतर माकडाने बरोबर तंबाखू खाल्ला...शेवटी परंपरा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com