Viral Video: नवरा गर्लफ्रेंडसोबत शॉपिंग करत होता, बायको अचानक पोहोचली, मॉलमध्येच झिंज्या धरून फ्री स्टाइल हाणामारी
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये दोन महिलांची तुफान हाणामारी पाहायला मिळतेय. उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील रॉबर्ट्सगं जवळच्या सिव्हिल लाईन रोडवरील सिटीकार्ट शॉपिंग मॉलमध्ये हा प्रकार घडला. शनिवारी संध्याकाळी ३ वाजण्याच्या सुमारास हा गोंधळ उडाला होता.
तिथल्या काही लोकांच्या सांगण्यानुसार, एक तरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत शॉपिंग करण्यासाटी आला होता. त्याचवेळेस त्याची पत्नी देखील तिथे आली. यावेळी त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि नंतर त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
पत्नी आणि गर्लफ्रेंड आल्या समोरा-समोर
पत्नीने तिच्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच तिला प्रचंड राग आला. अशावेळी तिचा संयम सुटला आणि दोन्ही महिलांमध्ये हाणामारी झाली. मुख्य म्हणजे हा गोंधळ ज्यावेळी झाला तेव्हा तो तरुण घटनास्थळावरून पळून गेला. तर दोन्ही महिला बराच वेळ भांडत राहिल्या.
सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ
ज्यावेळी हे भांडण झालं तेव्हा मॉलमधील लोकांनी हे भांडण पाहिलं तर काहींनी त्यांच्या फोनवर शूट केलं. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये दोन्ही महिला एकमेकांशी भांडताना आणि केस ओढताना दिसतायत. एका महिलेच्या हातावर जखमा दिसून येतायत.
मॉल मॅनेजमेंटने सांभाळली स्थिती
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याच समजताच मॉल कर्मचारी आणि ग्राहकांनी दोन्ही महिलांना बाजूला केलं. मॉलच्या मॅनेजमेंटच्या म्हणण्यानुसार, त्या दोघांनाही मॉलच्या बाहेर काढण्यात आलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

