Thalapathy Vijay CM oath : राजकारणात नवा ट्विस्ट! थलापती विजय यांचा शपथविधी रखडला; 'मॅजिक फिगर'साठी अजून २ आमदारांच्या पाठिंब्याची गरज

Thalapathy Vijay Political Update : तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर अजूनही सस्पेन्स कायम आहे. TVK पक्षाकडे सध्या ११६ आमदारांचे समर्थन असून बहुमतासाठी आणखी दोन आमदारांची गरज आहे.
Vijay CM oath suspense
Thalapathy Vijay awaits crucial support letters amid suspense over Tamil Nadu government formation.Saam TV marathi
Published On

Tamil Nadu government formation, Thalapathy Vijay CM oath : तामिळनाडूतील सत्तास्थापनेबाबत मोठी आणि महत्त्वाची घडामोडी समोर आली आहे. सुपरस्टार थलापती विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर अजूनही अद्याप सस्पेन्स कायम आहे. कारण बहुमताच्या आकड्यावरून तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. विजय यांना बहुमतासाठी २ आमदारांची आणखी गरज आहे. विजय यांनी राज्यपालांना ११६ आमदारांच्या समर्थनाचे पत्र दिले आहे. पण राज्यपाल राजेंद्र आर्लेकर ११८ आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्रावर अडून राहिल्याने पेच निर्माण झाला आहे. बहुमताच्या आकड्यासाठी दोन आमदारांची प्रतीक्षा विजय यांना आहे.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुपरस्टार विजय यांच्या 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाच्या सत्तास्थापनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. विजय यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असला तरी, तांत्रिक कारणांमुळे शपथविधीची अधिकृत तारीख आणि वेळ अद्याप जाहीर होऊ शकलेली नाही.

बहुमताचे गणित अजूनही अधांतरी?

मिळालेल्या माहितीनुसार विजय यांनी राज्यपाल आर. एन. रवी यांची भेट घेऊन ११६ आमदारांच्या समर्थनाचे पत्र सादर केले होते. पण तामिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी ११८ या मॅजिक फिगरची आवश्यकता आहे. विजय यांना बहुमतासाठी अजून दोन आमदारांच्या समर्थनाची गरज आहे. VCK आणि IUML या पक्षांनी विजय यांना पाठिंबा दर्शवला आहे, पण त्यांची अधिकृत समर्थन पत्रे अद्याप राज्यपालांकडे पोहोचलेली नाहीत. त्यामुळे जोपर्यंत हे पाठिंब्याचे पत्र राजभवनात सादर होत नाही, तोपर्यंत राज्यपाल शपथविधीसाठी हिरवा कंदील दाखवण्याची शक्यता कमी आहे.त्यामुळे विजय यांच्या कार्यालयाकडून अद्याप शपथविधीच्या सोहळ्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Vijay CM oath suspense
Sambhajinagar Accident : हळदीला जाताना काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत इंजिनिअरिंग विद्यार्थिनीचा मृत्यू

प्रतीक्षा संपणार का?

सुरुवातीला विजय यांचा शपथविधी ९ मे रोजी होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता दोन आमदारांच्या समर्थनाचे पत्र वेळेत न मिळाल्यास या सोहळ्याला विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे 'थलपती' विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ कधी घेणार? याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Vijay CM oath suspense
TVK चा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा; थलापती विजय होणार तामिळनाडूचे मुख्यमंत्री, सूवेंदू होणार बंगालचे अधिकारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com