TVK चा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा; थलापती विजय होणार तामिळनाडूचे मुख्यमंत्री, सूवेंदू होणार बंगालचे अधिकारी

Thalapathy Vijay Tamil Nadu government formation news : तामिळनाडूमध्ये थलपती विजय विजय आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
Vijay and Suvendu oath ceremony
Thalapathy Vijay and Suvendu Adhikari set to take oath as Chief Ministers in Tamil Nadu and West Bengal.Latest marathi news
Published On

TVK Forms Government in Tamil Nadu, Suvendu Adhikari to Take Oath as Bengal CM : तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांनंतर आता सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तर तामिळनाडूमध्ये थलापती विजय यांनी सत्तास्थापनेच्या आकड्याचे गणित जुळवले आहे. ते आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सकाळी ११ वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दोन्ही राज्यात सकाळी ११ वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

तामिळनाडूत 'थलपती' विजयचं सरकार

तामिळनाडूमध्ये विजय यांच्या 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) पार्टीने विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकून इतिहास घडवला. पण सुरुवातीला बहुमतासाठी काही जागा कमी पडल्याने राजकारण तापले होते. पण आता विजय यांना काँग्रेससह काही डाव्या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

विजय यांचा शपथविधी शनिवारी (९ मे २०२६) सकाळी ११ वाजता होणार आहे. थलापती विजय यांनी राज्यपाल आर. एन. रवी यांची शुक्रवारी भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यांना CPI, CPI(M) आणि VCK या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी बहुमताचा आकडा (११८) पूर्ण केला आहे.

Vijay and Suvendu oath ceremony
Accident : साताऱ्यात काळाचा घाला! आयशर ट्रक खोल दरीत कोसळला; लहान मुलासह ४ जणांचा मृत्यू

सुवेंदू अधिकारी नवे मुख्यमंत्री

पश्चिम बंगालमध्ये भाजपने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा दारूण पराभव करत सत्ता खेचून आणली. विधानसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये सत्तातंतर झालेय. सुवेंदू अधिकारी यांची भाजप विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड झाली आहे. सुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी सुद्धा शनिवारी (९ मे २०२६) सकाळी ११ वाजता कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राऊंडवर होणार आहे.

Vijay and Suvendu oath ceremony
सावत्र आईवर तरूणाचा बलात्कार, पीडित महिला चार महिन्यांची गर्भवती, नागपूरमधील धक्कादायक घटना

सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित २० राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेच्या २९४ जागांपैकी भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वात भाजपने तृणमूल काँग्रेसला धोबीपछाड दिली आहे.

Vijay and Suvendu oath ceremony
Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दारूच्या नशेत क्रूर कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com