Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दारूच्या नशेत क्रूर कृत्य

Lonavala crime news : लोणावळ्यात धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप कऱण्यात आला आहे.
Pune Crime: पुणे हादरले!
Pune Crime Saam Tv
Published On

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Pune Crime News : नसरापूर प्रकरणामुळे पुण्यात संतापाची लाट असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोणावळ्यात जन्मदात्या बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये बापाने दारूच्या नशेत क्रूर कृत्य केल्याचा खुलासा झाला आहे. मुलगी आता १८ वर्षांची झाली आहे, पण तिच्या मनात भीती कायम आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

लोणावळ्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना आज उघडकीस आली. जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर दारूच्या नशेत अत्याचार केल्याच्या घटनेने पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना ऑगस्ट २०२४ मध्ये घडली होती.

Pune Crime: पुणे हादरले!
SSC Result 2026 : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींनीच मारली बाजी; पाहा तुमच्या जिल्ह्याचा निकाल

याप्रकरणी आता तब्बल दीड वर्षानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये आरोपी पित्याने दारूच्या नशेत आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. या घटनेनंतर जिल्ह्यात संतापाचे वातावरण आहे.

Pune Crime: पुणे हादरले!
Gold Price Today : सोन्याचे दर घसरले! सराफा बाजार उघडताच २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर कोसळले; पाहा आजचे ताजे भाव

या घटनेमुळे पीडित मुलगी प्रचंड दहशतीखाली होती. सध्या तिचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे, मात्र या घटनेची भीती अद्यापही तिच्या मनात कायम होती. अखेर तिने धाडस करून या कृत्याबाबत वाचा फोडण्याचे ठरवले. पीडितेने सुरुवातीला ३ मे २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे या प्रकरणाची फिर्याद दिली होती. मात्र, घटनेचे ठिकाण लोणावळा असल्याने हा गुन्हा शून्य क्रमांकाने नोंदवून पुढील तपासासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या संतापजनक घटनेमुळे लोणावळा परिसरात खळबळ उडाली असून, लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Pune Crime: पुणे हादरले!
मोठी बातमी! १०७ आमदारांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा, देशाच्या राजकारणात खळबळ, नेमकं कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com