सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Tamil Nadu Politics: तमिळनाडूमध्ये विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकार सहा महिन्यात कोसळेल, असा दावा डीएमकेचे आमदार अनिथा राधाकृष्णन यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे तमिळनाडूमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Tamil Nadu Politics:
TAMIL NADU GOVERNMENT WILL COLLAPSE IN SIX MONTHS, CLAIMS OPPOSITION MLAsaam tv
Published On
Summary
  • टीव्हीके सरकार सहा महिन्यांत कोसळेल असा दावा.

  • डीएमके आमदार अनिथा राधाकृष्णन यांचे वक्तव्य चर्चेत.

  • मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्यावर जोरदार टीका.

विधानसभा निवडणुकीत वादळ उठवून सत्ताधाऱ्यांना धारातीर्थ पाडणाऱ्या टीव्हीकेच्या 'विजय' सरकारबाबत एका आमदाराने धक्कादायक दावा केला आहे. तमिळनाडूमधील नवं सरकार अवघे काही दिवसांचे असून ते येत्या सहा महिन्यात कोसळणार असल्याचा दावा डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि तिरुचेंदर मतदारसंघाचे आमदार अनिथा राधाकृष्णन यांनी केला आहे.

Tamil Nadu Politics:
सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

आमदार अनिथा राधाकृष्णन यांनी रविवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय आणि त्यांच्या टीव्हीके आघाडी सरकारवर टीका केली. हे सरकार सहा महिनेही टिकणार नाही. विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर डीएमके प्रमुख एम.के. स्टालिन पुन्हा मुख्यमंत्रीपदी परततील, असाही दावा अनिता राधाकृष्णन यांनी केला. दक्षिण तामिळनाडूमधील एका पक्ष कार्यक्रमात बोलताना राधाकृष्णन यांनी सत्ताधारी तमिळगा वेत्री कळघम (TVK) चे वरिष्ठ नेते आणि विल्लीवक्कम मतदारसंघातून विजयी झालेले आधव अर्जुन यांना आव्हान दिले.

Tamil Nadu Politics:
भाजप नगरसेवकांच्या घरावर बुलडोझर फिरणार? मनपाच्या नोटीसनंतर नेत्यांची धडधड वाढली

अर्जुन यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन तिरुचेंदूरमध्ये आपल्याविरुद्ध निवडणूक लढवावी असे आव्हान राधाकृष्ण यांनी दिले. राज्यातील टीव्हीकेचे सरकार हे फक्त आणखी चार महिने टिकणार आहे. आधव अर्जुन नावाचा एक माणूस आहे. जर हिंमत असेल तर तुमच्या आमदारकीचा राजीनामा द्या, मीही देतो. मग तिरुचेंदूरमध्ये समोरासमोर लढूया. हे आमचं शहर आहे. कोणालाही आम्ही पराभूत करू,असं राधाकृष्णन आव्हान देताना म्हणाले.

तिरुचेंदूर मतदारसंघ गेली २५ वर्षांपासून राधाकृष्णन यांचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यांनी २००१ मध्ये डीएमकेचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या अण्णा द्रविड मुनेत्र कळघमकडून प्रथम विजय मिळवला होता. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी द्रविड मुनेत्र कळघम (DMK) कडून निवडणूक लढवली तेव्हाही ते विजयी झाले होते. राधाकृष्णन यांनी कोलाथूर मतदारसंघात पराभूत झालेल्या एम.के. स्टालिन यांचेही समर्थन केलं. दरम्यान स्टालिन यांचा पराभव डीएमके सोडून विजय यांच्या टीव्हीकेत प्रवेश केलेल्या व्हीएस बाबू यांनी केला होता.

स्टालिन पुन्हा मुख्यमंत्री होणार

आम्हाला आमचे ‘थलैवर’ एम.के. स्टालिन यांनी त्रिचीमधून निवडणूक लढवावी असे वाटते. स्टालिन यांनी कोलाथूरला सिंगापूरसारखे बनवले, असे राधाकृष्णन म्हणाले. त्यानंतर त्यांनी मतदारांवर टीका करत त्यांना नालायक असे म्हटलं. आमचे ‘थलैवर’ हेच पुढचे मुख्यमंत्री आहेत. चार किंवा सहा महिन्यांनंतर आमचे नेते पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान विजय यांचे कार्यालय, टीव्हीके किंवा आधव अर्जुन यांनी अद्याप या वक्तव्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com