

पाच राज्याच्या निवडणुकीनंतर देशाच्या राजकारणात उलथापालथ
तामिळनाडूत काँग्रेसने डीएमकेची साथ सोडली
'एनडीए'कडून डीएमकेचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू
तामिळनाडूत डीएमके पक्षाने सत्ता गमावली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत थलपती विजय यांचा टीव्हीके पक्षाने सर्वात अधिक जागा जिंकल्या. देशातील पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर चेन्नई ते दिल्लीपर्यंत सत्ताकारण बदलताना दिसत आहे. तामिळनाडूत काँग्रेसने डीएमकेची साथ सोडून थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर भाजप आता डीएमके पक्षाशी हात मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे.
दक्षिणेतील तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेसने डीएमके पक्षाची साथ सोडून टीव्हीके पक्षाला पाठिंबा दर्शवलाय. काँग्रेसच्या भूमिकेने एम के स्टॅलिन यांना मोठा धक्का बसला. डीएमके पक्षाने इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर आता भाजपने डीएमके पक्षाला 'एनडीए'त घेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप आणि एनडीएची नजर आता डीएमके पक्षाच्या २२ लोकसभा आणि ८ राज्यसभा खासदारांवर आहे. डीएमके पक्षाचा बाहेरून पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एनडीए सध्या संसदेत दोन-तृतियांश बहुमत मिळवण्याच्या तयारीत आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर डीएमके पक्षाने काँग्रेसशी युती तोडली आहे. डीएमकेने लोकसभेत काँग्रेसपासून वेगळं बसण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनाही पत्र लिहिलं आहे. परंतु सनातन धर्माच्या मुद्द्यावरून डीएमके पक्ष आणि 'एनडीए'च्या प्रमुख नेत्यांशी थेट हातमिळवणी होण्याची शक्यता कमी आहे. परंतु पर्यायी मार्गाने समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, बीजेडी, वायएसआर काँग्रेस आणि बीआरएस यांच्या सारखे डीएमके पक्ष देखील भाजप प्रणित 'एनडीए'ला समर्थन देण्याची शक्यता आहे. डीएमके यांच्या २२ खासदारांचं समर्थन भाजपसाठी महत्वाचं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात डीएमके पक्ष 'एनडीए' आघाडीत सहभागी झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.