

ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट
सर्वात मोठा यंत्रणेला तपासाची सुत्रे
तपासातून धक्कादायक माहिती येण्याची शक्यता
ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाला सरकारने गांभीर्याने घेण्यास सांगितलं आहे. सरकारनेही या प्रकरणाचा तपास 'सीबीआय'ला करण्यास सांगितला आहे. सरकारने सर्वात मोठा यंत्रणेला तपासाची सुत्रे हाती दिल्याने ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ट्विशा शर्माचे कुटुंबीय आणि त्यांच्या वकिलांनी आरोपींच्या विरोधात कडक कारवाई व्हावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.ट्विशा शर्मा हिच्या कुटुंबातील वकील आयुष तिवारी यांनी कोर्टात मोठं-मोठे खुलासे केले आहेत. वकिलांनी ट्विशा शर्मा आणि तिची सासू गिरीबाला सिंह यांच्या व्हॉट्सअॅप चॅटचा पुरावा दाखवला आहे.
वकिलांनी म्हटलं की, 'दोघांमधील व्हॉट्सअॅप चॅटच्या पुराव्यातून स्पष्ट होत आहे की, मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. तिला भरपूर त्रास दिला गेला आहे'. ट्विशाच्या कुटुंबीयांनी सत्य समोर येण्यासाठी कोर्टात आणखी एक वेळा पोस्टमार्टम करण्याची मागणी केली आहे. ट्विशाच्या कुटुंबीयांच्या वकिलांनी आरोपी पती समर्थ सिंह यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी कोर्टात मागणी केली आहे. तसेच ट्विशाची सासू गिरीबाला सिंह हिचा देखील अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे.
वकील आयुष तिवारी यांनी पोलिसांत एफआयआर दाखल झाल्यानंतर काही तासांत गिरीबाला सिंह यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी केली. वकिलांनी थेट आरोप केला आहे की, या प्रकरणात तातडीने गिरीबाला सिंह हिला अटकपूर्व जामीन मिळालाय, तिने पदाचा चुकीचा वापर केल्याचा हा मोठा पुरावा आहे. या प्रकरणात ट्विशाच्या कुटुंबीयांनी मध्य प्रदेशच्या हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. तिच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात शनिवारी सुनावणी होणार आहे. कोर्टातील या सुनावणीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.