Maharashtra News Live Update: उल्हासनगरात जीन्स पार्सल कामगारांवर जीवघेणा हल्ला

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा, राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस, राजकीय घडामोडी, पेट्रोल-डिझेलची बचत करा, विदर्भाला उन्हाचा तडाखा, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update:
Maharashtra Live News Update: Saam TV Marathi

Maharashtra News Live Update: उल्हासनगरात जीन्स पार्सल कामगारांवर जीवघेणा हल्ला

उल्हासनगर स्कॅन क्रमांक पाच परिसरातील स्वामी शांती प्रकाश स्कूलजवळ जीन्स पार्सल व्यवसाय करणाऱ्या दोन भावांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कपिल पारवाणी आणि मनीष पारवाणी हे दोघे भाऊ जीन्स फॅक्टरीमध्ये पार्सल डिलिव्हरीचे काम करत असून माल उचलण्याच्या पैशांच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी मुस्ताक, हरदीप आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी लाकडी दांडक्याने दोघांवर बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात मनीष पारवाणी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com