देशातील आणखी एक पक्ष फुटला; पाठिंब्यावरून पडले २ गट, राजकीय वर्तुळात खळबळ

Tamil nadu politics : देशातील आणखी एक राजकीय पक्ष फुटल्याचे समोर आलं आहे. मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या सरकारला पाठिंबा देण्यावरून दोन गट पडले आहेत.
tamil nadu news
tamil nadu politicsSaam tv
Published On
Summary

तमिळनाडूतील राजकारणात उलथापालथ

अण्णा द्रमुक पक्षाच्या एका गटाचा टीव्हीके सरकारला पाठिंबा

टीव्हीके सरकारला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तामिळनाडू विजय यांच्यी टीव्हीके पक्षाची सत्ता स्थापन झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. टीव्हीके पक्षाने बहुमताचा आकडा गाठल्यानंतर एआयएडीएमके पक्षात फूट पडल्याचे समोर आलं आहे. तमिळनाडूतील विधीमंडळात १३ मे रोजी होणाऱ्या बहुमत चाचणीआधी एआयएडीएमकेचे नेते सीव्ही षण्मुगम यांनी थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.

पीटीआयच्या माहितीनुसार, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघमचे आमदार वेलुमणी आणि शनमुगम यांच्या नेतृत्वातील गटाने मुख्यमंत्री विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. षण्मुगम यांच्या माहितीनुसार, पक्ष प्रमुख पलानीस्वामी हे तमिळनाडूत सरकार स्थापना करण्यासाठी द्रविड मुनेत्र कळघम पक्षासोबत युती करू इच्छित होते. यादरम्यान अण्णा द्रमुकचे आमदार वेलुमणी यांनी तातडीने आमदारांची बैठक बोलवण्याची मागणी केली होती.

tamil nadu news
थलपती विजय यांची डरकाळी; तामिळनाडूत मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार, बेरजेचं राजकारण कसं जुळवलं?

शनमुगम यांचा विजय यांना पाठिंबा जाहीर

अण्णा द्रमुक नेते सीव्ही षण्मुगम यांनी म्हटलं की, 'आम्ही जनतेचा कौल स्वीकारतो. लोकांचा जनादेश टीव्हीकेला नसून विजय यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आहे. आम्ही मुख्यमंत्री विजय यांचं अभिनंदन करतो. मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातील टीव्हीके सरकारला पाठिंबा देतो'.

tamil nadu news
आणखी एक पक्ष फूटणार? ३० आमदार बंडाच्या भूमिकेत; विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारण तापलं

'आम्ही डीएमके पक्षाच्या विरोधात जाऊन पक्षाची स्थापना केली. मागील ५३ वर्ष आम्ही डीएमके पक्षाच्या विरोधात राजकारण केलं. दुसरीकडे डीएमके पक्षाच्या पाठिंब्यावर अण्णा द्रमुक पक्षाचे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु अण्णाद्रमुक पक्षातील बहुतेक आमदारांनी तो प्रस्ताव अमान्य केला. डीएमके यांच्यासोबत युती झाली असती, तर अण्णा द्रमुक पक्षाचं आस्तित्व नष्ट झालं असतं, असे त्यांनी सांगितले.

शनमुगम यांनी द्रमुक आणि अण्णाद्रमुक पक्षाच्या युतीला नकार दिलाय. आम्ही आता आघाडीविना आहोत. आता आम्हाला पक्ष नव्याने मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे. त्यामुळे आम्ही विजयी झालेल्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे शनमुगम यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com