थलपती विजय यांची डरकाळी; तामिळनाडूत मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार, बेरजेचं राजकारण कसं जुळवलं?

thalapathy vijay news : थलपती विजय यांचा तामिळनाडूत मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या पक्षाने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी इतर पक्षांचं समर्थन मिळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
thalapathy vijay news
thalapathy vijay Saam tv
Published On
Summary

तामिळनाडूत आता विजय सरकार

थलपती विजय यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा

थलपती विजय यांच्या पक्षाने बहुमताचा आकडा गाठला

तामिळनाडूच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. थलपती विजय यांना तामिळनाडूतील छोट्या राजकीय पक्षांनी समर्थन दिलं आहे. विजय यांना सत्ता स्थापनेसाठी डावे पक्ष सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे विजय यांच्या टीव्हीके पक्षाने अखेर सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा गाठला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सत्तेचं गणित कसं जुळवलं?

तामिळनाडूत सत्ता स्थापन करण्यासाठी ११८ आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. टीव्हीके पक्षाकडे १०८ जागा होत्या. त्यात विजय यांनी दोन जागांवर निवडणूक लढत जिंकल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसच्या पाच आमदारांनी त्यांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतरही आकडा ११३ झाला होता. त्यानंतर सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके पक्षाने टीव्हीके पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे.

thalapathy vijay news
आणखी एक पक्ष फूटणार? ३० आमदार बंडाच्या भूमिकेत; विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारण तापलं

थलपती विजय यांना ४ राजकीय पक्षांनी सत्ता स्थापन करणार असल्याचं निश्चित झालं आहे. सीपीआय पक्षाच्या बैठकीत टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या व्यतिरिक्त सीपीआय (M) यांच्या राज्य कमिटीच्या बैठकीतही विजय यांच्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दर्शवण्यात आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदुथलाई चिरुथैगल काची पक्षानेही विजय यांना पाठिंबा देण्यास होकार दिला आहे. सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा केली जाईल.

thalapathy vijay news
Tamil Nadu Election 2026 : निकालानंतर थलपती विजय मोठा निर्णय घेणार; आमदारकीचा राजीनामा देणार, कारण काय?

तामिळनाडूत विधानसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदारांचं समर्थन मिळूनही थलपती विजय यांचा टीव्हीके पक्ष १० पावले दूर होता. सुरुवातीला काँग्रेस पक्षाने थलपती विजय यांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर इतर छोट्या पक्षाने पाठिंबा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com