Tamil Nadu Election 2026 : निकालानंतर थलपती विजय मोठा निर्णय घेणार; आमदारकीचा राजीनामा देणार, कारण काय?

vijay thalapathy resign : विधानसभा निकालानंतर 'थलपती' विजय मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ते दोन पैकी एका जागेवरून आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
vijay thalapathy news
vijay thalapathy resignSaam tv
Published On
Summary

तामिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग

विजय यांच्या पक्षाने दिला प्रस्थापित पक्षांना धक्का

विधानसभा निकालानंतर थलपती विजय मोठा निर्णय घेण्याची शक्यता

तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली आहे. अभिनेता थलपती विजय यांच्या तामिळगा वेत्री कळघम पक्षाने जोरदार मुंसडी मारली. दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या 'टीव्हीके'ने प्रस्थापित द्रविडियन पक्षांना जोरदार धक्का दिला. पहिल्याच निवडणुकीत १०८ जागा जिंकून मागील ६ दशके पाय रोवून राजकारण करणाऱ्या DMK आणि AIADMK पक्षाच्या वर्चस्वाला सुरूंग लावला. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आता थलपती विजय मोठा निर्णय घेणार आहेत.

तामिळनाडू विधानसभेत दमदार कामगिरी केल्यानंतर 'टीव्हीके'चे प्रमुख थलपती विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रि‍पदी बसणार असल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत विजय यांनी दोन जागेतून निवडणूक लढवली होती. दोन्ही मतदारसंघातून विजय यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

विजय यांनी पेरंबूर येथून 'डीएमके'च्या आर.डी. शेखर यांचा 53,715 मतांनी दारुण पराभव केला. निकालानंतर विजय हे पोरंबूर येथील जागा स्वत:कडे कायम ठेवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर तिरुचिरापल्ली - पूर्व (Trichy East) मतदारसंघात 'डीएमके'च्या इनिगो इरुदयाराज यांचा 27,416 मतांनी पराभव केला. विजय हे कमी फरकाच्या मतांनी विजयी झालेल्या मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

vijay thalapathy news
तामिळनाडूत टीव्हीकेचा ब्लॉकबस्टर 'विजय'; थलपतीची राजकारणात दणदणीत एंट्री, DMK-AIDMK ला धक्का

तामिळनाडू विधानसभेत एकूण २३४ मतदारसंघ आहेत. त्यापैकी 'टीव्हीके' पक्षाने १०८ जागांवर विजय मिळवला. परंतु त्यांना ११८ ही बहुमताचा आकडा गाठता आला नाही. सत्ता स्थापन करण्यासाठी थलपती विजय यांचा पक्ष या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, डावे पक्षांसोबत वाटघाटी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर या विधानसभा निवडणुकीत डीएमके ५९ तर AIADMK पक्षाला ४७ जागा जिंकता आल्या.

vijay thalapathy news
Vijay Thalapathy: 'विजय थलापतीचा पराभव होणार...' अफवा ऐकून चाहत्याने चिरला गळा; आता TVK ने मारली बाजी

तामिळनाडूमधील पेरंपूर हा उत्तर चेन्नईचा भाग आहे. त्यात हा भाग DMK पक्षाचा बालेकिल्ला मानला जातोय. मात्र, थलपती विजय यांनी DMK पक्षाच्या बालेकिल्याला सुरूंग लावला. विजय हे लोकप्रियतेच्या जीवावर मतदारांना वळवण्यात यशस्वी ठरले. तामिळनाडूतील मतदारांनीही थलपती विजय यांच्या 'टीव्हीके' पक्षाच्या पारड्यात भरभरून मते टाकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com