तामिळनाडूत टीव्हीकेचा ब्लॉकबस्टर 'विजय'; थलपतीची राजकारणात दणदणीत एंट्री, DMK-AIDMK ला धक्का

Tamil Nadu Election: तामिळनाडूत प्रस्थापित DMK आणि AIDMKची सत्ता उलथवून विजय थलपतीच्या TVK पक्षानं दणदणीत विजय मिळवलाय. मात्र थलपतीच्या या विजयामागची नेमकी कारणं कोणती आहेत? तामिळनाडूत राजकीय परिवर्तन का झालं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Tamil Nadu Election:
Thalapathy Vijay celebrates after leading TVK to a historic electoral victory in Tamil Nadu.saam tv
Published On
Summary
  • टीव्हीकेचा तामिळनाडूत ऐतिहासिक विजय

  • DMK आणि AIADMKचा मोठा पराभव

  • विजयच्या लोकप्रियतेचा मोठा प्रभाव

सेवोम मान्ट्रोम सेवॉम म्हणजेच चला बदल घडवूया हा नारा दिला. अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय थलापतींनी. आणि तामिळनाडूत डीएमके आणि एआयडीएमकेच्या सत्तेला सुरुंग लावत थलापतीनं ब्लॉकबस्टर विजय मिळवला. तामिळगा वेत्री कळघम हा दोन वर्षांपुर्वी स्थापन केलेल्या पक्ष लोकांपर्यंत पोहोचवला आणि लोकांना बदलासाठी साद घालत ऐतिहासिक विजय मिळवला.

Tamil Nadu Election:
Tamilnadu Assembly Election Result : सर्वात मोठी बातमी ! मुख्यमंत्र्यांचा आपल्याच बालेकिल्ल्यात दारूण पराभव; कोणी मारली बाजी?

तामिळनाडूत टीव्हीकेच्या ब्लॉकबस्टर विजयाला कारण ठरलंय ते प्रस्थापित डीएमके आणि एआयडीएमके सोडून तामिळनाडूच्या जनतेला मिळालेला नवा पर्याय.थलापती विजयवर कुठलेही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. त्यामुळे क्लीन इमेजचा फायदा झाला.

याबरोबरच महिलांना दर महिन्याला अडीच हजार रुपये आर्थिक मदत, वर्षाला 6 गॅस सिलेंडर मोफत देण्याचं आश्वासन, मुलींच्या लग्नासाठी 8 ग्रॅम सोनं आणि रेशमी साडी, महिलांना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, प्रत्येक कुटुंबाला 200 युनिटपर्यंत मोफत वीज, हिंदीसक्तीला विरोध करत तामिळ आणि इंग्रजी भाषांचं धोरण, पदवीधर तरुणांना दर महिन्याला 4 तर डिप्लोमा धारकांना अडीच हजार रुपये बेरोजगारी भत्ता देण्याचं आश्वासन दिलं होतं. पीकाला हमी भाव आणि कर्जमाफीचा मुद्दाही लोकांना भावल्याचं चित्र निकालातून पुढे आलंय

Tamil Nadu Election:
Trisha Krishnan: थलापती विजयची सत्ता; निवडणुकीचे आकडे येताच अभिनेत्री त्रिशा पोहचली भेटायला, व्हिडिओ आला समोर

थलापती विजयनं पक्ष स्थापन केल्यानंतर लोकप्रिय घोषणांच्या माध्यमातून लोकांना साद घातली. सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर केला. त्यामुळेच तामिळनाडूत क्रांती घडलीय. तामिळनाडूमध्ये 1977 मध्ये अभिनेते एमजी रामचंद्रन यांनी एआयएडीएमकेची स्थापना केली आणि तामिळनाडूचं मुख्यमंत्रिपदही मिळवलं.आता त्याच प्रकारे विजय थलापतीनंही मोठा विजय मिळवलाय.मात्र विजय थलापती दिलेली आश्वासनं कशी पूर्ण करणार यावर भविष्यातील तामिळनाडूची दिशा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com