Vijay Thalapathy: 'विजय थलापतीचा पराभव होणार...' अफवा ऐकून चाहत्याने चिरला गळा; आता TVK ने मारली बाजी

Tamil Nadu Elections 2026: विजय थलापतीच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार टीव्हीकेने डीएमके पक्षाचा जोरदार पराभव केला.
Vijay Thalapathy: 'विजय थलापतीचा पराभव होणार...' अफवा ऐकून चाहत्याने चिरला गळा; आता TVK ने मारली बाजी
Vijay ThalapathySaam Tv
Published On

Summary -

  • विजय थलापतीच्या पराभवाच्या अफवेमुळे चाहत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

  • वेळेत उपचार मिळाल्याने चाहत्याचे प्राण वाचले

  • तामिळनाडूत TVK पक्षाची जोरदार आघाडी

  • विजय थलापतीच्या TVK पक्षाने DMK ला दिला मोठा धक्का

साऊथ सुपरस्टार थलापती विजयने सिनेसृष्टीला रामराम ठोकत राजकारणात एन्ट्री केली. विजय जवळपास ३६ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय असून त्यांनी एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले. त्याची राजकारणातील एन्ट्री देखील हिट ठरली. विजय थलापतीच्या चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निवडणुकीत विजय थलापतीच्या पक्षाचे काय होतंय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी त्याच्या एका चाहत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने गळा चिरून घेतला. विजय थलापतीचा पराभव होणार या अफवेमुळे त्याच्या चाहत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याचे प्राण वाचले. पण आता निकालादरम्यान विजय थलापतीचा पक्ष चांगली बाजी मारताना दिसत आहे.

विजय थलापतीचा चाहता महेंद्र हा २८ वर्षांचा आहे. तो तमिळनाडूतील कृष्णगिरी येथील रहिवासी आहे. विजय थलापतीचा पक्ष टीव्हीकेचा विधानसभा निवडणुकीत पराभव होईल अशा अफवा पसरल्या होत्या. यावर महेंद्रने विश्वास ठेवला होता. या अफवांवर विश्वास ठेवत त्याने चाकूने स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. विजयच्या पराभवाच्या भीतीने त्याने मतमोजणीपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला.

Vijay Thalapathy: 'विजय थलापतीचा पराभव होणार...' अफवा ऐकून चाहत्याने चिरला गळा; आता TVK ने मारली बाजी
Tamil Nadu Election Results: मोठी उलथापालथ! थलापति विजय मुख्यमंत्री होणार? तामिळनाडूत सर्वात मोठा उलटफेर

महेंद्र घराबाहेर चाकू घेऊन उभा होता. अचानक त्याने चाकू गळ्यावरून फिरवत आत्महत्येचा प्रयत्न केला. आसपासच्या लोकांनी तात्काळ त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. वेळेत रुग्णालयात नेल्यामुळे त्याचे प्राण वाचले. महेंद्रवर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, मतमोजणीपूर्वी टीव्हीके पक्षाच्या पराभवाच्या अफवा पसरल्या होत्या. यामुळे महेंद्र खूप अवस्थ झाला आणि त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

Vijay Thalapathy: 'विजय थलापतीचा पराभव होणार...' अफवा ऐकून चाहत्याने चिरला गळा; आता TVK ने मारली बाजी
Vijay Thalapathy: विजय थलपती ते खुशबू सुंदर; २०२६ च्या तामिळनाडू निवडणुकांमध्ये कोणत्या 'पॉवर स्टार'च्या पक्षाची येणार सत्ता?

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी डीएमके पक्षाला मोठा धक्का बसला. या निवडणुकीत नुकताच राजकारणात एन्ट्री घेतलेल्या सुपरस्टार थलापति विजय यांच्या टीव्हीके पक्षाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. विजय थलापतीच्या राजकारणातील एन्ट्री देखील जबरदस्त ठरली. विजय थलापतीच्या टीव्हीके पक्षाने जोरदार मुसंडी मारत डीएमकेचा पराभव करत विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. तामिळनाडूचा मुख्यमंत्री विजय थलापती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. विजयचा टीव्हीके पक्ष १०९ जागांवर आघाडीवर आहे. तर डीएमकेला फक्त ५६ जागांवर आघाडी मिळाली आहे.

Vijay Thalapathy: 'विजय थलापतीचा पराभव होणार...' अफवा ऐकून चाहत्याने चिरला गळा; आता TVK ने मारली बाजी
Vijay Thalapati: मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख, तर जखमींना २ लाख रुपये; चेंगराचेंगरीनंतर विजय थलापतीकडून मदत जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com