उदयनराजे भोसले रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत अपडेट| VIDEO

Udayanraje Bhonsle Admitted To Ruby Hall Clinic Pune For Routine Checkup: साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये नियमित आरोग्य तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.

साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांना आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही त्यांची नियमित आरोग्य तपासणी (Routine Check-up) असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उदयनराजे भोसले आज सकाळी स्वतःहून रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू होत्या, मात्र रुग्णालय प्रशासनाने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ही तपासणी त्यांच्या नियमित आरोग्य देखभालीचा एक भाग आहे. रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले की, उदयनराजे भोसले यांची प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. केवळ नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात आले आहेत. सर्व आवश्यक चाचण्या झाल्यानंतर त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाईल. उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी आणि चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com