Vijay Thalapati: मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख, तर जखमींना २ लाख रुपये; चेंगराचेंगरीनंतर विजय थलापतीकडून मदत जाहीर

Stampede at Vijay Thalapathy’s rally in Karur: तमिळनाडूच्या करूर येथे अभिनेता विजय थलापती याच्या रॅलीदरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली. यामध्ये ३९ जणांचा मृत्यू तर १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले. विजय थलापतीकडून मदत जाहीर करण्यात आली.
Vijay Thalapati: मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख, तर जखमींना २ लाख रुपये; चेंगराचेंगरीनंतर विजय थलापतीकडून मदत जाहीर
Stampede at Vijay Thalapathy’s rally in Karur saam tv
Published On

Summary -

  • विजय थलापतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी होऊन ३९ जणांचा मृत्यू झाला.

  • जखमींची संख्या १०० पेक्षा जास्त झाली असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

  • मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख आणि जखमींना २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.

  • तमिळनाडू सरकारकडूने देखील स्वतंत्र मदत जाहीर केली.

साऊथचा सुपरस्टार विजय थलापतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली. शनिवारी तमिळनाडूच्या करूर येथे ही घटना घडली. या घटनेत आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला. तर १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर दु:ख व्यक्त करत विजय थलापतीने मदत जाहीर केली आहे.

Vijay Thalapati: मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख, तर जखमींना २ लाख रुपये; चेंगराचेंगरीनंतर विजय थलापतीकडून मदत जाहीर
Bengaluru Stampede: "मलाही इथंच राहायचंय''...बंगळुरू चेंगराचेंगरीत मुलाचा मृत्यू; बापाने स्मशानभूमीत फोडला टाहो , VIDEO पाहून सर्वांचे डोळे पानावले

विजय थलापतीने रॅलीदरम्यान चेंगराचेंगरीमध्ये मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमी झालेल्यांना मदत जाहीर केली आहे. या घटनेत ३९ जणांचा मृत्यू झाला या सर्वांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमी झालेल्यांना २ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत विजय थलापतीने मदतीची घोषणा केली.

Vijay Thalapati: मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख, तर जखमींना २ लाख रुपये; चेंगराचेंगरीनंतर विजय थलापतीकडून मदत जाहीर
Tamil Nadu Stampede: विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशामुळे झाली? नेत्यांमुळे की पाण्याच्या बाटल्या वाटपामुळे? मुख्य कारण काय

विजय थलापतीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'माझ्या हृदयातील वेदनांचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझे डोळे आणि मन दुःखाने भरलेले आहे. मी भेटलेल्या तुमच्या सर्वांचे चेहरे माझ्या डोक्यात सतत येत आहेत. मला प्रेम आणि काळजी दाखवणाऱ्या माझ्या प्रियजनांबद्दल मी जितके जास्त विचार करतो तितका मला आणखी त्रास होत आहे.'

Vijay Thalapati: मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख, तर जखमींना २ लाख रुपये; चेंगराचेंगरीनंतर विजय थलापतीकडून मदत जाहीर
Stampede In Rally: अभिनेता विजय थलपथीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, १० जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

या पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिले की, 'आपल्या प्रियजनांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या तुम्हा सर्वांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. मी तुमच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे आणि हे प्रचंड दुःख मी शेअर करतो. हे खरोखरच आपल्यासाठी एक मोठं नुकसान आहे. आम्हाला कोणीही सांत्वन दिले तरी आमच्या प्रियजनांचे नुकसान असह्य आहे. तरीही तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी सर्व कुटुंबांना २० लाख रुपये आणि उपचार घेत असलेल्या जखमींना २ लाख रुपये देऊ इच्छितो. दरम्यान, तमिळनाडू सरकारने चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर जखमींना १ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

Vijay Thalapati: मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख, तर जखमींना २ लाख रुपये; चेंगराचेंगरीनंतर विजय थलापतीकडून मदत जाहीर
Actor Vijay Rally Stampede : १७ महिला, ९ मुलांसह ३९ जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू, ५१ जण ICU मध्ये, थलापति विजयच्या रॅलीत अनर्थ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com