Bengaluru Stampede: "मलाही इथंच राहायचंय''...बंगळुरू चेंगराचेंगरीत मुलाचा मृत्यू; बापाने स्मशानभूमीत फोडला टाहो , VIDEO पाहून सर्वांचे डोळे पानावले

M. Chinnaswamy Stadium incident: आयपीएलच्या २०२५ या वर्षीच्या सीझनमध्ये जिंकल्यानंतर एक मोठी दुर्घटना झाली होती. ज्यात एका कर्नाटकच्या एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्या संबंधित एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
M. Chinnaswamy Stadium incident
Bengaluru StampedeSaam Tv
Published On

बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या दुर्घटनेत ८ जणांपेक्षा जास्त जणांता मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनेला काही दिवसांचा अवधी उलटा असला तरी त्याचे दुखत पडसात अजूनही दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेसंबंधित एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो पाहून तुच्याही डोळ्यात पाणी येईल.

आयपीएलच्या २०२५ या वर्षीच्या सीझनमध्ये १८ वर्षानंतर आरसीबीने चषक जिंकला. त्यात विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर हजारो चाहते जमा झाले होते. चाहत्याची गर्दी ऐवढी होती की, या स्टेडियमबाहेर लोकांना नीट उभे राहण्यासाठीही जागा नव्हती. या स्टेडियमबाहेरच चाहत्यांची चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. त्यात कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातील २१ वर्षीय भूमिक लक्ष्मय याचाही समावेश होता. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ मयत तरुणाच्या वडिलांच्या आहे. ज्यात या घटनेनंतर भूमिकचे वडील बी.टी. लक्ष्मण यांचा मुलाच्या समाधीवर रडताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com