Tamil Nadu Politics: राज्य सरकार तीन महिन्यात कोसळणार; माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Tamil Nadu Politics: थलपथी विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकार तीन महिनेसुद्धा टिकणार नाही. टीव्हीके केवळ त्यांच्या पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या पाठिंब्यामुळेच सत्तेत आहे. यामुळे तामिळनाडूच्या राजकारणातील शाब्दिक चकमक पुन्हा तीव्र झाली आहे.
Tamil Nadu Politics:
Former Chief Minister M.K. Stalin's remarks on the future of the TVK government have intensified political debate in Tamil Nadu.Saam tv
Published On
Summary
  • टीव्हीके सरकार तीन महिनेही टिकणार नाही.

  • थलपथी विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर त्यांनी सार्वजनिकरित्या टीका

  • या वक्तव्यामुळे तामिळनाडूतील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात राजकीय शाब्दिक चकमक पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. डीएमके अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्यातील राजकारणावर मोठं भाष्य केलंय. थलपथी विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारबद्दल एक मोठं वक्तव्य केलंय. एका कार्यक्रमात बोलताना एम.के. स्टॅलिन म्हणाले की, विजय यांचे सरकार तीन महिने सुद्धा टिकणार नाही, एम.के. स्टॅलिन हे विजय आणि टीव्हीके सरकारवर सातत्याने टीका करत आहेत.

Tamil Nadu Politics:
TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

TVK सरकार आमच्यामुळे सत्तेत

राज्यातील राजकारणाविषयी माजी मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम.के. स्टॅलिन म्हणाले की, आम्ही युतीमधील भागीदारांना टीव्हीकेला पाठिंबा देण्यापासून रोखले नाही. राज्यात राजकीय अस्थिरता आणि राष्ट्रपती राजवटीसारखी परिस्थिती टाळण्याचा त्यामागील हेतू होता, असं ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाला राज्यात कोणत्या प्रकारे फायदा होईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नव्हती. दरम्यान काँग्रेससहित पाच राजकीय पक्षांनी टीव्हीके सरकारला पाठिंबा दिलाय. हे सर्व पक्ष डीएमके नेतृत्वखालील सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्सचा भाग राहिलेत.

टीव्हीकेवर निशाणा

शनिवारी चेन्नई येथे एका कार्यक्रमात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्टॅलिन यांनी टीव्हीके सरकारवर निशाणा साधला. जर डीएमके आणि त्यांच्या मित्रपक्षांनी वेगळी भूमिका घेतली असती, तर राजकीय परिस्थिती वेगळी असू शकली असती. स्टॅलिन यांनी पक्ष कार्यकर्त्यांना टीव्हीके सरकारविरोधातील आपला राजकीय लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले आहे.

Tamil Nadu Politics:
अवघ्या काही तासातच बंडखोर आमदारांच्या गटात फूट; राज्यातील राजकारण फिरलं!

आपल्या भाषणात स्टॅलिन यांनी सांगितले की, निवडणुकांनंतर त्यांच्या आघाडीतील अनेक पक्षांनी टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. मित्रपक्षांच्या नेत्यांनी यावर आधीच त्यांच्याशी चर्चा केली होती आणि हा निर्णय त्यांच्या माहितीनेच घेण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com