अवघ्या काही तासातच बंडखोर आमदारांच्या गटात फूट; राज्यातील राजकारण फिरलं!

West Bengal Politics : तृणमूल काँग्रेस नेतृत्वाविरोधात मोठ्या बंडानंतर लगेचच बंडखोर आमदारांच्या गोटात फूट पडताना दिसत आहे. यामुळे पश्चिम बंगालमधील राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे.
West Bengal Politics  :
Rebel MLAs hold discussions amid escalating political tensions and internal disagreements in the Trinamool Congress camp.saam tv
Published On
Summary
  • पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसविरोधातील बंडाला नवीन वळण

  • बंडखोर आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर लगेचच त्यांच्यात मतभेद उफाळून आले.

  • ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेवरून बंडखोर छावणीत तीव्र वाद

पश्चिम बंगालच्या राजकारणातील उलथापालथ थांबण्याचं नाव घेईना. अभिषेक बॅनर्जीमुळे नाराज झालेल्या आमदारांनी वेगळा गट स्थापन केला. परंतु नवी गट स्थापन करत नाही तोच त्यांच्यात वाद विवाद होत फूट फडत असल्याचं चित्र निर्माण झालंय. तृणमूल काँग्रेसमध्ये झालेल्या ऐतिहासिक बंडाला एक दिवस उलटत नाही तोच, बंडखोर आमदारांच्या गोटात मोठे मतभेद निर्माण झालेत.

West Bengal Politics  :
TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

पक्षाच्या ५८ आमदारांनी बंड करत विधिमंडळ पक्षावर ताबा मिळवला पण ममता बॅनर्जीवरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. पक्षाच्या संस्थापक ममता बॅनर्जी यांना केवळ सल्लागार भूमिकेपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या प्रस्तावाला बंडखोर आमदारांमध्येच तीव्र विरोध सुरू झाला आहे. यामुळे या बंडखोरांच्या छावणीत अंतर्गत संघर्ष पेटल्याचे स्पष्ट झाले असून बंगालच्या राजकारणाचा अंक अजून संपललेला नाहीये.

West Bengal Politics  :
CJP Protest: तिरंगा आणि पुस्तक आणा, सनस्क्रीन लावा...; आंदोलनासाठी कॉकरोच पार्टीची गाईडलाईन

नवनियुक्त विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी बंडखोर गटाची एक बैठक झाली. या बैठकीत अनेक आमदारांनी उघडपणे आक्रमक भूमिका घेत ममता बॅनर्जी याच पक्षाच्या सर्वोच्च नेत्या राहतील, असा पुनरुच्चार केला. ऋतव्रत बॅनर्जी यांनी बुधवारी ममता बॅनर्जींना पुनर्रचित विधिमंडळ पक्षाचे मुख्य सल्लागार करण्याची घोषणा केली होती.

दरम्यान बंडखोरी ही ममता बॅनर्जी यांच्याविरोधात नाही, हे कार्यकर्त्यांना पटवून देण्यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु आमदारांच्या एका मोठ्या वर्गाला असे वाटत की, यामुळे ममता बॅनर्जीचे अधिकार आणि महत्त्व कमी होईल.

West Bengal Politics  :
BJP ला आणखी एक मोठा धक्का; ऐन निवडणुकीआधी बडा नेता सोडणार पक्षाची साथ

गुलशन मुल्लिक यांनी तर बैठकीनंतर थेट इशारा दिला आहे. आम्हाला सांगण्यात आले होते की, हा पक्ष ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाखालीच चालेल. त्या केवळ सल्लागार नाहीत, तर आमच्या सर्वोच्च नेत्या आहेत. जर त्यांचे हे स्थान नाकारले गेले, तर आम्हाला या बंडखोर गटात राहायचे की नाही, याचा विचार करावा लागेल, असा इशारा मुल्लिक यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com