CJP Protest: तिरंगा आणि पुस्तक आणा, सनस्क्रीन लावा...; आंदोलनासाठी कॉकरोच पार्टीची गाईडलाईन

Cockroach Janta Party do’s and don’ts List: पक्षाने आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकांना सकाळी ९ वाजता जंतर मंतरजवळील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचण्यास सांगितले आहे. तसेच आंदोलनाला येताना काय करावे, काय करू नये याची माहिती दिली आहे.
Cockroach Janta Party do’s and don’ts  List
Participants gather preparations for the CJP protest at Jantar Mantar as organizers issue a list of instructionssaam tv
Published On
Summary
  • सीजेपीचे पहिले मोठे आंदोलन दिल्लीतील जंतर मंतर येथे होत आहे.

  • आंदोलनकर्त्यांसाठी तिरंगा, पुस्तक आणि सनस्क्रीन बाळगण्याच्या सुचना

  • सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके भारतात येणार

देशभरात कॉकरोच पार्टीची चर्चा सुरू आहे. त्याच दरम्यान सीजेपी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे ६ जून रोजी आपले पहिले आंदोलन करणार आहे. आंदोलनकर्त्यांनी काय करावे आणि काय करू नये याची एक यादी जारी केली आहे. यामध्ये तिरंगा सोबत बाळगणे, सनस्क्रीन लावणे आणि प्रत्येक गोष्टीचे रेकॉर्डिंग करणे यांचा समावेश आहे.

ठाण्यातील तरुण आंदोलकांनी सीजेपीचं नाव घेत अचानक आंदोलन केले होतं. आता हा 'पक्ष' दिल्लीत भव्य आंदोलन करत आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकांना ६ जून रोजी सकाळी ९ वाजता जंतर मंतरजवळील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचण्यास सांगितले आहे. दरम्यान सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके हे भारतात येणार आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत त्याची माहिती दिली.

यासह त्याने देशातील युवकांना दिल्ली विमानतळावर येऊ नये असं सांगितलं आहे. जर विमानतळावर गर्दी निर्माण झाली तर त्यामुळे गोंधळ निर्माण होईल आणि जनतेला वेठीस धरले जाऊ शकते. त्याचदरम्यान X वरील एका पोस्टमध्ये, आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकांनी काय करावे आणि काय करू नये याचीही माहिती दिली आहे.

“कॉकरोचर्स, ६ जून उद्या सकाळी ९ वाजता भेटूया, धर्मेंद्र प्रधान यांचा घेवूनच राहुया ! या छोट्याशा विनोदाचे क्रांतीत रूपांतर करण्याची वेळ आली आहे. शांततापूर्ण आणि प्रेमळ विरोधासाठी दिल्लीच्या रस्त्यांवर गर्दी करण्यास सज्ज व्हा.” असं म्हटलंय. पण यासह काय करायचे आणि काय नाही हे लक्षात ठेवा. सगळ्यांचे डोळे आपल्यावर आहेत! असा सल्लाही सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिलाय.

Do's: काय करावे:

• पक्षाकडून आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकांना ६ जून रोजी सकाळी ९ वाजता जंतर मंतरजवळील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन येथे पोहोचण्याचे आवाहन करण्यात आलंय.

• आंदोलक शिक्षणाचा हक्क आणि समान संधीचे समर्थन करत असल्याने, त्यांनी राष्ट्रध्वज तिरंगा आणि एक पुस्तक सोबत ठेवावे, असेही पक्षाकडून सांगण्यात आले आहे. आंदोलकांनी जबाबदारीने आणि शांततेने आंदोलनाचे “रेकॉर्डिग” करावे, असे आवाहनही पक्षाने केले आहे.

Cockroach Janta Party do’s and don’ts  List
भारताच्या राजकारणात नव्या पक्षाची एन्ट्री, २ दिवसांत झाले ५० लाख सदस्य; कोण आहे संस्थापक?

•आंदोलनात कोणतेही गैरवर्तन आढळले तर त्याची तात्काळ पोलिसांना माहिती द्या.

• कृपया हवामानानुसार तयारी करून या, पुरेसे पाणी प्या आणि तुमच्या आरोग्याची व सुरक्षेची काळजी घ्या. तसेच आंदोलकांना सनस्क्रीन लावण्याचे आणि टोपी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. “आपण सूर्यासोबत सहकार्य केले पाहिजे,” असे पक्षाने म्हटले.

Don'ts: काय करू नये:

• आंदोलकांनी एकटे न येऊ नये, कारण जेव्हा “झुरळ” गटागटाने येतात, त्यामुळे गटाने, जोडीने किंवा कुटंबासोबत यावे, ज्यामुळे आंदोलन अधिक प्रभावी होईल. . “जेव्हा तुम्ही कुटुंबासोबत येता तेव्हा आंदोलनाला अधिक जोर येतो.”, असं पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

• “फुले आणा आणि पोलिसांना द्या, आंदोलकांनी फुले फेकू नयेत, त्याऐवजी ती पोलिसांना आदराने द्यावीत, असाही सल्ला देण्यात आला. आपल्या तरुणांच्या भविष्याची काळजी घेतल्याबद्दल त्यांचे आभार माना.”

Cockroach Janta Party do’s and don’ts  List
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, 'CJP'चं 'X' अकाऊंट निलंबित

आंदोलकांनी ट्रोलर्स किंवा चिथावणीखोरांशी संवाद साधू नये.

आंदोलकांनी उपाशीपोटी येऊ नये असेही आवाहन लोकांना करण्यात आले आहे. “ आंदोलनाला येण्यापूर्वी जेवण करा, क्रांतीसाठी न्याहारीची आवश्यकता असते.” असं पक्षाकडून सांगण्यात आलंय.

हे आंदोलन का होत आहे?

भारतातील अनेक परीक्षा वादांनंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन असल्याचे दीपके म्हणाले. दरम्यान सोशल मीडियावर लक्षणीय प्रसिद्धी मिळवलेल्या आपल्या व्यंगात्मक राजकीय संघटनेची स्थापना केल्यापासून दीपके यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com