सोशल मीडियाच्या इतिहासात जे कधी घडलं नाही ते गेल्या आठवडाभरात घडलं. बेरोजगार आणि तरुणांच्या हक्कासाठी त्यांच्या प्रश्नांसाठी उपहासात्मक पद्धतीनं सुरू झालेल्या 'कॉक्रोच जनता पार्टी' म्हणजेच CJP ने लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. याचाच धसका घेऊन 'CJP'चं अधिकृत 'X' अकाऊंट भारतात निलंबित करण्यात आल्य़ाची चर्चा आता सुरू झालीय. मात्र कायदेशीर मागणीचा हवाला देत केंद्र सरकारने हे अकाऊंट ब्लॉक केल्याचं समजतंय. तर वाढत्या लोकप्रियतेमुळे ही कारवाई होणार याची आम्हाला पूर्ण कल्पना होती, अशी प्रतिक्रीया पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधिशांनी बेरोजगार तरुणांची तुलना 'झुरळांशी' केली होती. याच विधानाचा निषेध म्हणून आणि व्यवस्थेला टोला लगावण्यासाठी मूळचा हिंगोलीतील उच्चशिक्षित तरुण अभिजित दिपके याने 'कॉक्रोच जनता पार्टी'ची स्थापना केली. "आळशी आणि बेरोजगारांचा आवाज" असं ब्रीदवाक्य घेतलेल्या या पक्षाने अल्पावधीत तरुणांची मने जिंकली आहेत. पण, हीच वाढती लोकप्रियता आता सरकारच्या डोळ्यात खुपली असल्याचा आरोप राजकीय विरोधी पक्ष करत आहेत. देशातील तरुण अस्वस्थ असल्यानं कॉक्रोच पार्टीला समर्थन मिळत असल्याचं खासदार संजय राऊतांचं म्हणणयं. तर तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा उद्रेक असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय.
सोशल मीडियावरील एका उपहासात्मक पक्षाची ताकद एवढी वाढली की थेट प्रस्थापितांनाही त्याची दखल घ्यावी लागली. अकाऊंट ब्लॉक करून आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला असला, तरी डिजिटल विश्वातील हा 'कॉक्रोच' एवढ्यात शांत बसणार नाही, असंच चित्र सध्या दिसतंय. मात्र हा कॉक्रोच व्यवस्थेविरोधात कसं रुप घेतोय, कसा संघर्ष करतोय ते पाहणं महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.