लज्जास्पद! बॉयफ्रेंडसोबत डिनर, निर्जनस्थळी शरीरसंबंध ठेवले, मित्रही पोहचले; पोलीस कॉन्स्टेबल महिलेवर तिघांचा बलात्कार

Tamil Nadu crime news today : तमिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यात ड्युटीनंतर मित्रासोबत गेलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.
Crime
CrimeSaam Tv
Published On

Tamil Nadu woman police constable gang rape cas : कायद्याचे रक्षण करणारी खाकी वर्दीही आता सुरक्षित राहिलेली नाही, याचे धक्कादायक उदाहरण तमिळनाडूतून समोर आले आहे. ड्युटी संपवून आपल्या बॉयफ्रेंडसोबत एका निर्जनस्थळी गेलेल्या ३० वर्षीय विवाहित महिला पोलीस कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे या नराधमांच्या तावडीतून सुटून पीडित महिला पोलिसाने एका शेतात धाव घेत नियंत्रण कक्षाशी (Control Room) संपर्क साधला आणि स्वतःची सुटका करून घेतली. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

तमिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यात एका ३० वर्षीय विवाहित महिला पोलीस हवालदारावर (कॉन्स्टेबल) सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी तिघांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्री ड्युटी संपल्यानंतर ही महिला डी. रॉबिन (२८, रा. तिरुपुवनम) या आपल्या मित्रासोबत डिनरसाठी बाहेर गेली होती.

Crime
Gold Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा बदल, प्रति तोळा किती रूपयांना मिळणार? पाहा ताजे दर

जेवण झाल्यानंतर दोघेही एका निर्जनस्थळी गेले. तिथे दोघांमध्ये संबंध आले, मात्र त्यानंतर रॉबिनने त्या महिलेचा एक्स बॉयफ्रेंड पी. महाराजा (२५, रा. सिथलांगुडी) याच्याशी संपर्क साधून त्यालाही त्याच निर्जन ठिकाणी बोलावून घेतले. यानंतर या नराधमांनी पीडित महिला पोलिसावर अत्याचार केला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रॉबिन, महाराजा आणि त्यांच्या एका साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.

Crime
El Niño : मान्सून का रेंगाळला? 'एल निनो'चा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? पुण्यात पाऊस कधी कोसळणार? पाहा IMD चा अंदाज

रॉबिनच्या फोननंतर त्याचा मित्र महाराजा हरी राजन याला सोबत घेऊन तिथे आला. महाराजाने पीडितेकडे लैंगिक संबंधांची केली, पण जिला तिने कडाडून विरोध केला. मात्र नराधम महाराजाने आणि त्यानंतर हरी राजनने महिला पोलिसावर बळजबरीने बलात्कार केला. हे तिघे जण पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असतानाच पीडितेने तिथून पळ काढला.

Crime
Accident : राजनाथ सिंह यांच्या कुटुंबावर शोककळा; पुतण्याचा भीषण अपघातात मृत्यू

पीडित महिला धावत एका जवळच्या फार्म हाऊसवर पोहोचली आणि तिथल्या एका व्यक्तीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्या व्यक्तीने प्रसंगावधान राखत त्वरित पोलिसांसोबत संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ पावले उचलत घटनास्थळ गाठले आणि पीडितेची सुटका केली. या संतापजनक घटनेनंतर महिला पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवघ्या २४ तासांत रॉबिन, महाराजा आणि हरी राजन या तिघांनाही बेड्या ठोकल्या. सर्व आरोपींची आता जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

Crime
Plane Crash : हवाई दलाचे विमान कोसळले, ५ जवानांचा मृत्यू, देशावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com