Accident : राजनाथ सिंह यांच्या कुटुंबावर शोककळा; पुतण्याचा भीषण अपघातात मृत्यू

Prashant Singh death : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे पुतणे प्रशांत सिंह यांचा मध्य प्रदेशातील भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. भरधाव बसच्या धडकेत गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Rajnath Singh nephew accident news
Rajnath Singh nephew accident news Saam
Published On

Rajnath Singh nephew accident news : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे पुतणे प्रशांत सिंह यांचे अपघाती निधन झाले. मध्य प्रदेशातील इंदूरला परतत असताना एका बसने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर बसचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. २९ वर्षीय प्रशांत सिंह यांच्या निधनाने मंत्री राजनाथ सिंह यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय प्रशांत सिंह मित्रांसोबत बाहेर गेले होते. देवासहून इंदूरला परतत असताना काळाने घाला घातला. प्रशांत यांनी तातडीच्या कामासाठी आपली गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि ते खाली उतरले. आपले काम झाल्यानंतर प्रशांत कारमध्ये बसण्यासाठी येत असतानाच, एका भरधाव बसने त्यांना जोरात धडक दिली. बसची धडक इतकी भीषण होती की प्रशांत दूर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मित्रांनी प्रशांत यांना तात्काळ जवळच्याच अरबिंदो रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Rajnath Singh nephew accident news
Maharashtra Politics : शरद पवारांना केंद्रीय मंत्र्याची मोठी ऑफर; काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याऐवजी भाजपसोबत येण्याचे आमंत्रण

प्रशांत सिंह यांच्या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक भाजप नेते तात्काळ रुग्णालयात पोहोचले होते. सोनकच्छचे आमदार राजेश सोनकर यांच्यासह अनेक नेते रात्री उशिरा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रशासनानेही हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे.

Rajnath Singh nephew accident news
El Niño : मान्सून का रेंगाळला? 'एल निनो'चा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? पुण्यात पाऊस कधी कोसळणार? पाहा IMD चा अंदाज

प्रशांत सिंह हे उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रेवती भागातील गायघाट गावातील रहिवासी होते. त्यांचे वडील प्रदीप सिंह हे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे चुलत भाऊ आहेत; त्यामुळे प्रशांत सिंह हे राजनाथ सिंह यांचे पुतणे होते. प्रशांत हे कुटुंबात सर्वांचेच लाडके होते. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि शांत असल्याने लोकांसोबत त्यांची लगेच मैत्री व्हायची, असे त्यांच्या मित्रांनी सांगितले.

Rajnath Singh nephew accident news
वायुसेनेचे विमान क्रॅश! लँडिंगनंतर विमानाला लागली भीषण आग; बचावकार्य सुरू

अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर प्रशांत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (पोस्टमार्टम) सरकारी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन झाल्यानंतर प्रशांत यांचा मृतदेह त्यांचे मूळ गाव बलिया येथे नेण्यात आला. तिथे कुटुंबाकडून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशांत यांच्या अकाली निधनाने सिंह कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बलिया गावात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Rajnath Singh nephew accident news
Horoscope Today: कोणाला मिळणार गुड न्यूज, कोणाला धनलाभ? पाहा सर्व १२ राशींचे आजचे भाग्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com