माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला करणारा कोण? पहिला व्हिडिओ आला समोर; फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

Sukhbir Singh Badal Attacker Jaspal Singh First Video From Nanded: सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमधील हजूर साहिब गुरुद्वारात हल्ला करणाऱ्या जसपाल सिंहला अटक करण्यात आली आहे. हल्ल्यानंतरचा पहिला व्हिडिओ समोर आला असून फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
SUKHBIR SINGH BADAL ATTACK: JASPAL SINGH IDENTIFIED, FIRST VIDEO SURFACES
SUKHBIR SINGH BADAL ATTACK: JASPAL SINGH IDENTIFIED, FIRST VIDEO SURFACESsaam tv
Published On

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटली आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक एसपी रोहन नीलाभ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखबीर सिंह यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे नाव जसपाल सिंह असे आहे. जसपाल सिंह हा एक वयोवृद्ध माणूस आहे. घटनेनंतरचा त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. हल्ल्यानंतर झालेल्या झटापटीत त्याची पगडी सुटली. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जसपालची पगडी बांधताना दिसत असून हा व्हिडिओ हल्ल्यानंतरचा असल्याचे सांगितले जात आहे.

सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर हा लॉ (LAW) चे शिक्षण झाले असल्याचे सांगत आहे. अटकेनंतर आरोपीने सांगितले की, त्याने पुण्यातून वकिलीचे शिक्षण घेतले आहे. सुखबीर सिंह बादल यांनी पंजाबला उडता पंजाब बनवले, ज्यामुळे मी प्रचंड संतापात होतो. पंजाबमध्ये वाढत्या अंमली पदार्थांमुळे आपण रागात होतो. यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.

SUKHBIR SINGH BADAL ATTACK: JASPAL SINGH IDENTIFIED, FIRST VIDEO SURFACES
माजी मंत्र्याची पक्षातून हकालपट्टी; पक्षप्रमुखांची मोठी कारवाई; इतर नेत्यांमध्ये खळबळ

नांदेडचे एसपी रोहन नीलाभ यांनी सांगितले की, आरोपी जसपाल सिंह याला अटक करण्यात आली आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर हजूर साहिब गुरुद्वारात हल्ला करण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com