Sonia Gandhi : सोनिया गांधींची प्रकृती कशी आहे? महत्वाची अपडेट आली समोर

Sonia Gandhi health update : सोनिया गांधी यांच्या प्रकृतीविषयी महत्वाची अपडेट समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी रुग्णालयातील डॉक्टरांनी महत्वाची माहिती दिली.
Sonia Gandhi news
Sonia Gandhi health updateSaam tv
Published On
Summary

सोनिया गांधी यांची प्रकृती सुधारली

रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी

रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या, राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती सुधारली आहे. सोनिया गांधी यांना मंगळवारी रात्री सर गंगाराम रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सर गंगाराम रुग्णालयाने त्यांच्या आरोग्याविषयी मेडिकल बुलेटिन जारी केलं आहे.

सोनिया गांधींवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार

रुग्णालयाच्या प्रशासनानुसार, सोनिया गांधी यांना मंगळवारी रात्री १०.२२ वाजता रुग्णालयात दाखल केले. गंगाराम रुग्णालयाचे चेअरमन डॉ. अजय स्वरुप यांनी सांगितलं की त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखी उपचार सुरू आहेत'.

Sonia Gandhi news
Gold Rate : गुढीपाडवा धमाका! २४ तासांत सोनं ४ हजारांनी स्वस्त, तर चांदी १३ हजारांनी स्वस्त; पाहा आजचे दर

'पोट आणि युरिनरी इन्फेक्शनची समस्या आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना उपचार म्हणून अँटिबायोटिक्स दिले जात आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले. वातावरणात बदल झाल्याने त्यांची तब्येत बिघडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या तब्येतीविषयी फार चिंता करण्याची गरज नाही. त्यांची तब्येत स्थिर असून डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. सोनिया गांधींची तब्येत बिघडल्याने रायबरेलीचे खासदार आणि त्यांचे पुत्र राहिल गांधी हे दिल्लीत थांबले आहेत.

Sonia Gandhi news
Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

राहुल गांधींकडून दौरा केला रद्द

राहुल गांधी यांचा आज बुधवारी केरळमध्ये निवडणुकीसाठी दौरा होता. परंतु त्यांनी दौरा रद्द केला. त्यांच्या ऐवजी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे कोझिगडला रवाना झाले. मागील वर्षी जून महिन्यात सोनिया गांधी यांना पोट दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना गॅस्ट्रो विभागाच्या देखरेखी ठेवण्यात आलं होतं. त्याआधी हिमाचल प्रदेशच्या शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com