Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, गॅस सिलिंडरचा तुटवड्याचे संकट, इराण-इस्त्राइल-अमेरिका युद्धाचे अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News Updatesaam TV marathi
Published On

कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

दोन भाविकांच्या अंगावर अक्षरशः तुटून पडल्याचा व्हिडिओ व्हायरल.

महाराष्ट्र केसरी विजेत्या हर्षवर्धन सदगीरचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

स्पर्धेतील विजेते हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेते महेंद्र गायकवाड यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर-चारठाणा रोडवर भीषण अपघात; कार आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक

परभणी जिल्ह्यातील जिंतूर-चारठाणा रोडवर आज एक भीषण अपघात घडला असून कार आणि ट्रॅव्हल्स यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण वसमत येथील रहिवासी असून ईदच्या निमित्ताने मंठा येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते.

भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात विरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

- नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या तक्रारीनंतर तिसरा गुन्हा दाखल

- विवाह जुळवणे, भविष्य सांगणे आणि धार्मिक विधीच्या नावाखाली महिलेवर अनेकदा लैंगिक अत्याचार

सलग दुसऱ्या दिवशीही भोंदूबाबा अशोक खरातची सात तास चौकशी

- खरातसोबत फार्महाऊसवरील दोन कामगार आणि मंदिरातील एक पुजारी होता SIT च्या रडारवर

- नुकताच खरातचा ताबा नाशिकच्या क्राईम ब्रँचने घेतलाय

- आज लैंगिक शोषण प्रकरणी खरातवर दाखल झालाय दुसरा गुन्हा

- आज गरोदरपणात महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दाखल झालाय गुन्हा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाला वादाची किनार

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि कुस्तीगीर संघ यांच्या मध्ये सुरू आहेत वाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येणार नाही..

महाराष्ट्र केसरी विजेतेला पुरस्कार कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आणि मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दिले जाणार आहेत..

बीडच्या परळीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना

परळी तालुका पुन्हा हादरला,

बलात्कार,लैगिंक अत्याचार, विनयभंग एकापाठोपाठ सत्र सुरूच

बीड जिल्ह्यात स्त्री संरक्षण कायद्याचे तीनतेरा,

50 वर्षीय नराधमांकडून 9 वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार.

सदरील घटनेमुळे परिसरात संतापाची लाट.

महेंद्र गायकवाड माती विभागातून महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी दाखल

रायगड पोलिसांकडून 72 लाखाची गोवा बनावटीची नकली दारू जप्त

नेरळ पोलिसांनी केली टँकरवर कारवाई

० गुजरातकडे दारूची वाहतूक होत असल्याची माहिती उघड

रायगडच्या नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गोवा बनावटीची 72 लाखांची दारू जप्त केली आहे. टँकरमधून या दारूची वाहतूक केली जात होती. या प्रकरणी टँकरसह दारू जप्त करून नेरळ पोलिस ठाण्यात टँकर चालक लादुराम बिश्नोई याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एव्हरग्रीन रिझर्व्ह व्हिस्की, मोबी व्होडका, ऑरेंज अशा कंपनीची हि दारू आहे.

नवी मुंबईत इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

नवी मुंबईतील तुर्भे सेक्टर 21 परिसरात एका इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचा फैलाव होत बाजूच्या दोन ते तीन दुकानांनाही फटका बसला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून पोलीस दलही सतर्क झाले आहे. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

धाराशिवमध्ये टॉवर लाईनवरून शेतकऱ्यांचा संताप; आत्मदहनाचा इशारा

धाराशिव जिल्ह्यातील डोंगरेवाडी येथे टॉवर लाईनच्या कामावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. योग्य मोबदला मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. काही शेतकरी टॉवरवर चढून आंदोलन करत असून कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची झाली. शेतातून लाईन जात असताना समसमान मोबदला दिला जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.

उपराष्ट्रपतींनी पुण्यात महात्मा गांधींच्या प्रतिमेसमोर वाहिली पुष्पांजली

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पुण्यातील निसर्गोपचार आश्रम येथे महात्मा महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी गांधीजींच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या अहिंसा आणि सत्याच्या मार्गाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला स्थानिक अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. राष्ट्रपित्याच्या आदर्शांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तिसऱ्यांना राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली... - रामदास आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष देशभर विस्तारण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्वांच्या पाठबळामुळे तिसऱ्यांदा राज्यसभेत जाण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांत पक्ष उमेदवार देणार असल्याचेही स्पष्ट केले. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न राहतील, तसेच नरेंद्र मोदी यांच्या विकास दृष्टिकोनाला पाठिंबा असल्याचे त्यांनी नमूद केले. दलित-सवर्ण एकतेवरही त्यांनी भर दिला.

भिवंडीतील कोन गावात भंगार गोदामाला भीषण आग

भिवंडी तालुक्यातील कोन गावात भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन भंगार गोदाम पूर्णपणे जळून खाक झाली. गोदामात कापड, प्लास्टिक आणि कागदाचा मोठा साठा असल्याने आगीने वेगाने फैलाव घेतला. गावातील अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Jalna: ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन, 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जालना -

ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन, वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते...

जालना येथील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास..

ओबीसी (इतर मागास वर्ग) चळवळीतील आक्रमक चेहरा हा ओळख..

Bhiwandi: भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे भंगार गोदामाला भीषण आग

भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे भंगार गोदामाला भीषण आग

आगीत भंगारची 2 गोदाम जळून खाक

गोदामात मोठ्या प्रमाणात कापड ,प्लास्टिक व कागदाच्या वस्तू साठा

गावातला अज्ञाताकडून आग लावल्याने आग पसरत जाऊन भंगार गोदामा मध्ये लागली

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल

आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

Nashik: भोंदूबाबा अशोक खरात नाशिक पोलिसांच्या ताब्यात

नाशिक -

- भोंदूबाबा अशोक खरात नाशिक पोलिसांच्या ताब्यात

- खरातला SIT टीमकडून नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं

- गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात आज दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी नाशिक पोलिसांनी घेतला खरातचा ताबा

- नाशिकच्या क्राइम ब्रँच युनिट १ मध्ये चौकशीसाठी खरातला आणलं

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय भारसाकडे यांनी युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला

  • अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय भारसाकडे यांनी युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला.

  • हा पक्षप्रवेश आमदार रवी राणा आणि सुनील राणा यांच्या उपस्थितीत पार पडला.

  • नगरपालिका निवडणुकांनंतर दर्यापूरच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे.

  • संजय भारसाकडे हे शहरात शांत, संयमी आणि सामाजिक कार्यात सक्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.

  • त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  • आगामी काळात विविध पक्ष व संघटनांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली.

  • कार्यक्रमाला अमोल कोरडे, राहुल गावंडे, श्रीकांत इंगळे, अविनाश काळे आणि अंकुश रहाटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कल्याण स्थानकावर थरार! OHE खांबावर चढलेल्या व्यक्तीमुळे रेल्वे सेवा विस्कळीत

  • कल्याण स्थानकावर एक व्यक्ती PF 1, 1A आणि 2 साठी वीजपुरवठा करणाऱ्या OHE खांबावर एक इसम चढला

  • ठाकुर्ली ते आंबिवली दरम्यान डाउन लोकल लाईनचा वीजपुरवठा बंद करण्यात आला

  • २ मेल/एक्सप्रेस गाड्या आणि ३ लोकल गाड्या उशिराने धावत आहेत.

  • व्यक्तीला सुरक्षित खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत

धाराशिवच्या बालाघाट डोंगररांगावर रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार

धाराशिवच्या बालाघाट डोंगर रांगाच्या माथ्यावर तुळजापूर नगरीत ऐन उन्हाच्या पारात बैलगाडा शर्यतीचा थरार रंगलेला पाहायला मिळाला.या बैलगाडा शर्यतीत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ते विदर्भातील हिंगोली पर्यंत चे बैलगाडा मालक व स्पर्धक आपली बैल जोडी घेऊन दाखल झाले होते.शिवबा प्रतिष्ठान च्या वतीने शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते तर याही वर्षी या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं हे शर्यतीत 120 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला.या स्पर्धेचे हे पाचवे वर्षे आहे.शर्यत पाहण्यासाठी मोठ्या संख्येने तुळजापूर व परिसरातील बैलगाडा प्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

मनसेची उद्या मुंबईत बैठक

  • मनसे ची उद्या मुंबईत बैठक

  • राज ठाकरेंनी उद्या बोलवली महत्वाची बैठक

  • मुंबईत शिवतीर्थवर सकाळी ११ वाजता होणार बैठक

  • राज्यातील सरचिटणीस, नेते बैठकीला राहणार उपस्थित

  • राज्यातील पक्ष संघटनेत बदल, पक्षाची पुढील रणनीती, तयार केलेली वेबसाईट यावर चर्चा होण्याची शक्यता

परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कोट्यवधीचा घोटाळा

परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या 2019 पासून च्या लेखापरीक्षण अहवालाचा आधार घेत मनसेच्या वतीने आज पत्रकार परिषद घेऊन विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्या असल्याचे आरोप करण्यात आले आहे. चक्क लेखापरीक्षण अहवालच समोर आल्यामुळे ही अनागोंदी खरी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मनसे कडून आज पत्रकार परिषद घेऊन ही सर्व माहिती देण्यात आली. एक मे पर्यंत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केलेले गैरव्यवहार सुरळीत केले नाही तर दोन मे रोजी विद्यापीठाच्या विरोधात मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा मनसे कडून देण्यात आला आहे

Ahilyanagar: अहिल्यानगर MIDC मध्ये 5 दिवसांचा आठवडा होण्याची शक्यता

अहिल्यानगर -

अहिल्यानगर MIDC मध्ये पाच दिवसाचा आठवडा होण्याची शक्यता

इंडस्ट्रियल गॅसचा पुरवठा होत नसल्याने अनेक उद्योजकांनी पाच दिवसाचा आठवडा करण्याची केली असोसिएशनकडे मागणी

उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या गॅसच्या तुटवड्यामुळे कारखान्यांचे कामकाज सुरळीत चालवणे झाले कठीण

तर अहिल्यानगर उद्योजक असोसिएशन पाच दिवसाच्या आठवड्या संदर्भात घेणार बैठक...

बैठक घेऊन पाच दिवसाचा आठवडा करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याची अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांची माहिती

Amravati: अमरावती जिल्ह्यात संघटित गो तस्करीच्या टोळ्या सक्रिय

अमरावती -

- अमरावती जिल्ह्यात संघटित गो तस्करीच्या टोळ्या सक्रिय...

- वरूड तालुक्यातील हिवरखेड येथे नागठाणा जवळ केंद्र

- मध्यप्रदेश सीमेपर्यंत पसरलेले रॅकेट

- भाजप खासदार डॉ.अनिल बोंडे यांचे पोलिस अधीक्षकांना पत्र, गो तस्करीच संपूर्ण रॅकेट केलं उघड

- गुन्हेगारांविरुद्ध मोक्का लावण्याची मागणी

- भाजप खासदार अनिल बोन्डे यांच्या आरोपाने खळबळ

Nashik : भोंदूबाबा अशोक खरातच्या SIT चौकशीची व्याप्ती वाढली

- भोंदूबाबा अशोक खरातच्या SIT चौकशीची व्याप्ती वाढली

- SIT टीममधील अधिकाऱ्यांची संख्या वाढवली

- महिला लैंगिक अत्याचारप्रकरणी अशोक खरातच्या SIT चौकशीला वेग

- एकाच वेळी खरातच्या महिला लैंगिक अत्याचार, अन्य गुन्हे, कोट्यावधींची संपत्ती, व्यवहारांची आणि संस्थानच्या संदर्भातील SIT चौकशी

- खरात विरोधातील चौकशी लवकर पूर्ण करण्याचा SIT चा प्रयत्न, सूत्रांची माहिती

Beed : नेकनूर पोलिसांकडून रात्रभर मांजरसुंबा चौकात वाहनधारकांकडुन वसुली

बीडच्या नेकनूर पोलीसांकडून वाहनधारकांची सर्रास लुट होत असल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.

धुळे-सोलापुर आणि अहिल्यानगर-अहमदपुर राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांकडुन दंड न करता पैसे घेऊन लुट केली

मांजरसुंबा चौकातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या सोबत पोलीस वाहनधारकांकडुन पैसे घेऊन लुट करत आहेत असा दावा केला जात आहे.

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात आमदार आणि मंत्र्यांचीही गयावया नाही

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणांमध्ये आमदार मंत्री कुणाचीही गयावया केली जाणार नाही

मुख्यमंत्री कठोर कारवाई करतील असं भाजपचे नेते आमदार संजय केणेकर म्हणाले आहेत

दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य महिला आयोगावर आयएस आयपीएस महिलेची नियुक्ती करावी

Mirgaon : भोंदूबाबा अशोक खरातच्या मिरगावमधील मंदिरातील पुजाऱ्याची होणार चौकशी

- भोंदूबाबा अशोक खरातच्या मिरगावमधील ईशान्येश्वर मंदिरातील पुजाऱ्याची होणार चौकशी

- मिरगावच्या फॉर्म हाऊसवरील कामगारांची देखील होणार चौकशी

- पुजारी आणि कामगारांच्या चौकशीतून फॉर्म हाउसवर काय कारनामे चालायचे, याचा खुलासा होणार

- पुजारी, कामगार आणि अशोक खरातची एकत्रित चौकशी होण्याची शक्यता

Nashik : नाशिकच्या मालेगावचा पारा 40 अंशांवर

नाशिकच्या मालेगावचा पारा 40 अंशांवर

नाशिकच्या मालेगाव मधील सामान्य रुग्णालय अलर्ट मोडवर रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू

Hingoli: हिंगोलीतून सिकंदर शेख महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत उतरणार

हिंगोली -

हिंगोलीतून सिकंदर शेख महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत उतरणार

विशाल व्यायाम शाळेतील मल्ला मध्ये मध्ये उत्साह

सिकंदर शेख जिंकण्यासाठी प्रार्थना

Pune: अशोक खरात प्रकरणात तृप्ती देसाई यांनी रुपाली चाकणकर यांच्याशी तडजोड केली - रुपाली पाटील

पुणे -

अशोक खरात प्रकरणात तृप्ती देसाई यांनी रुपाली चाकणकर यांच्याशी तडजोड केली

रुपाली पाटील यांचा गंभीर आरोप

तृप्ती देसाई यांच्याकडे या संदर्भातील व्हिडीओ आधीच आलेला होता मात्र तृप्ती देसाई यांनी खरात यांच्या पत्नीशी आणि रुपाली चाकणकर यांच्याशी तडजोड केली

यामध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप केलाय

या प्रकरणात देसाई यांचीही एसआयटी ने चौकशी करावी अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली आहे

भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा SIT चौकशी होण्याची शक्यता

- अशोक खरातसह त्याच्या मिरगावच्या फॉर्म हाऊसवरील कामगारांना देखील चौकशीला बोलवण्याची शक्यता

- अशोक खरातचा पोलिस कोठडीत आणि चौकशीत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती

- बंदोबस्तावर तैनात अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांचं भूतकाळ, भविष्य सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती

- मात्र कायद्यापुढे कुणीही मोठा नसल्याचं सांगत पोलिसांनी खरातला दाखवला पोलिसी खाक्या, सूत्रांची माहिती

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार? शिवसेना खासदारांची मोर्चेबांधणी सुरु

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याच्या विश्वसनीय माहितीनंतर मंत्रीपदी वर्णी लागण्यासाठी शिवसेना खासदारांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याच्या हालचाली दिसून येत आहेत.मंगळवारला शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.दीड तासांच्या चर्चेत राज्यातील महत्वाच्या विषयांबरोबरच मंत्रीमंडळातील संभाव्य बदलाबाबतही चर्चा झाल्याचे समजते. तत्पूर्वी सोमवारी रात्री शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या राज्यातील सर्व (सातही) खासदारांची बैठक घेतली.यावेळी शिंदे म्हणाले,"मी महाराष्ट्रात आणि तुम्ही दिल्लीत असलात तरी माझ्याकडे तुमच्या कामकाजाची सर्व माहिती येते.तुमच्या सगळ्यांच्या कामांवर माझे बारकाईने लक्ष आहे.पक्षाची आणि सरकारची बाजू सभागृहात जोरदारपणे मांडा.पक्षाचे प्रतिनिधित्व दिसण्यासाठी सभागृहात उपस्थित राहून विविध आयुधांच्या आधारे प्रश्न मांडा.काम करणा-यांचा पक्षाकडून योग्य सन्मान केला जातो तेच येथेही सर्वांना लागू होईल."असं सांगितलं

१० लाखांच्या खैर साठ्यासह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त,  वनविभागाची धडक कारवाई

सिंधुदुर्गातील इन्सुली-बांदा राज्यमार्गावर वनविभागाने खैर लाकडाच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई करत तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. आठ दिवसांपूर्वीच एक टेम्पो पकडल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा १० लाखांच्या खैर लाकडासह ट्रक पकडून वनविभागाने तस्करांना मोठा दणका दिला आहे. या प्रकरणी सावंतवाडी तळवडे येथील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पादुका दर्शनासाठी सज्ज आज सांगता होणार

'सकाळ माध्यम समूहा'ने आयोजित केलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाल्याने

वेगवेगळ्या सोयी-सुविधांनी 'भक्तीचा महाकुंभ' सज्ज होत आहे. पादुका दर्शन सोहळ्याबद्दल भाविकांमध्ये भक्तिमय वातावरण आहे उत्सवाला असून, संत आणि सद्गुरूंच्या २१ पादुकांसाठी आकर्षक मंदिरे साकारली आहेत

मुंबई येथील एमडी ड्रग्ज तस्कर अमरावती मध्ये डिलिव्हरी करताना जेरबंद

-मुंबई येथील एमडी ड्रग्ज तस्करासह अमरावती शहरातील तस्कराला लालखडी ते नवसारी मार्गावर एमडी ड्रग्जची डिलिव्हरी देताना अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात अटक व त्यांच्या ताब्यातून ११ लाख ७९फ हजार रुपयांची ७८ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केली आहे.गुन्हे शाखेच्या पथकाने ८ फेब्रुवारीला चार आरोपींना अटक व २ किलो ८० ग्रॅम एमडी जप्त केली होती. त्यानंतर बडनेरा विश्रामगृहालगत दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून ७६ ग्रॅम एमडी जप्त केली होती.या दोन्ही गुन्ह्यात सखोल तपास केल्यानंतर मुंबई येथील काही युवक शहरातील एमडी तस्करांना स्वतः एमडी आणून देत असल्याचे उघड झाले.दरम्यान मुंबई येथील तस्कर आजिम अमद शेख शनिवारी शहरातील एकाला एमडी देण्याकरिता येत असल्याची टिप मिळाली.सायंकाळी आजिम हा लालखडी ते नवसारी

मार्गावर उभा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. काही वेळाने एका ऑटोरिक्षामध्ये शेख समीर आला. दोघे एमडीची डिलिव्हरी करीत होते. त्याचवेळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील ७८ ग्रॅम एम डी ड्रग्स जप्त करीत दोघांना आहे.

शेतात पिवळे सोने पीकविणाऱ्या शेतकऱ्यांना युद्धाची धास्ती

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा थेट फटका हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला आहे, देशात सर्वाधिक हळदीचे उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यात हजारो हेक्टर शेतीवर हळदीची लागवड केल्या जाती, वर्षभराचं पीक असलेल्या या हळद पिकाची पोटच्या लेकराप्रमाणे शेतकरी सोय घेतात, हळद उत्पादक शेतकऱ्यांचे कुटुंब आणि मुलाबाळांचे शिक्षण हळदीच्या उत्पादनावर अवलंबून असल्याने हळदीला दरवर्षी भाव किती मिळतो याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागलेली असती मात्र यंदाच्या वर्षी युद्धजन्य स्थितीमुळे, शेतकऱ्यांच्या हळदीचे दर तब्बल दीड हजार रुपयांनी घसरले आहेत, हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये प्रति क्विंटल 14 हजार रुपये ते 14,500 प्रतिक्विंटल दराने विक्री होणे अपेक्षित असताना शेतकऱ्यांच्या हळदीला सद्या 12 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे, संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेली हळद ठेवण्यासाठी जागा देखील अपुरी असल्याने यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर हळद निर्यात झाली नाही तर शेतकऱ्यांना आणखी फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

चालत्या बसमध्ये दागिने लांबवणारी महिला टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.....

वाशीम जिल्ह्यात चालत्या बसमधून प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या सराईत महिला टोळीला वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.ही महिला टोळी विशेषतः गर्दीच्या बसमध्ये महिलांना टार्गेट करत असे. प्रवासादरम्यान गोंधळ निर्माण करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याच्या साखळ्या व इतर दागिने लंपास केले जात होते.

बेंगलोर मुंबई महामार्गावर अपघात

बेंगलोर मुंबई महामार्गावर असणाऱ्या पुण्यातील दरी पुलावर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सात ते आठ वाहनांचं मोठं नुकसान झालं. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचा या अपघातात समावेश होता. यातील एका वाहनाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की काही वाहनं पुलावरील रेलिंगला धडकल्याने संपूर्ण रेलिंग च नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी सुद्धा पुण्यातील नवले पूल तसेच दरीपूल या भागात होणाऱ्या अपघाताच्या संदर्भातला प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दीपक केसरकर यांची एसआयटी चौकशी करा- विनायक राऊत

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात माजी खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.दीपक केसरकर यांचीच आता एसआयटी चौकशी करण्याची आवश्यकता आहे. एकनाथ शिंदे यांना कॅप्टन खरात यांचा रस्ता दीपक केसरकरांनी दाखवला आणि गुवाहाटीचा रस्ता सुद्धा खरात आणि दिपक केसरकरांनीच दाखवला होता असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. कॅप्टन खरात यांच्या सेवेमध्ये जे जे मंत्री मग्न झाले होते, त्या सगळ्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याची आवश्यकता आहे. कॅप्टन खरात जेव्हा आपल तोंड उघडेल आणि काही नेत्यांची नावे बाहेर येतील त्यांच्याकडून कॅप्टन खरातला संपवण्याचा प्रयत्न होईल अशी भिती ही विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही दबाव न मानता संबंधित व्हिडिओ सार्वजनिक करावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मागील तीन वर्षात 532 अपघात तर 223 जणांचा मृत्यू

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मागील तीन वर्षात 532 अपघात तर 223 जणांचा मृत्यू

नियमाचे पालन केल्याने अपघात कमी झाल्याची माहिती

2023 ते 25 कालावधीत 532 अपघात झाले त्या 223 जणांचा मृत्यू

2023 मध्ये 154 अपघात होऊन 65 जणांचा मृत्यू झाला. 2024 मध्ये 191 अपघात झाले त्यात 90 जणांचा मृत्यू

2025 मध्ये 187 अपघात होऊन 68 जणांचा मृत्यू झाला असल्याचा परिवहन विभागाकडून सांगण्यात आला आहे

नवोदय परीक्षेत जिल्हा परिषद शाळांचा बोलबाला

जिल्हा परिषद शाळेतील घटनारी विद्यार्थ्यांची पटसंख्या चिंतेची बाब असली तरी जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी गुणवत्ता मात्र टिकवून ठेवल्याचे धाराशिव मध्ये चित्र दिसत आहे.धाराशिव जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेत यंदाही जिल्हा परिषद शाळांनीच बाजी मारली आहे.तुळजापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण ८० पैकी ६६ जागा पटकावण्यात जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना यश आले आहे.विशेष म्हणजे यावेळी तब्बल ७७ विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने विद्यार्थ्यांकडून परीक्षेची उत्तमरीत्या तयारी करून घेणाऱ्या शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.

सोसायटीने पीएनजी गॅस चा वापर करावा यासाठी सहकार विभाग जनजागृती मोहीम राबवणार

पुणे शहरातील 6000 सोसायटीमध्ये पीएनजी गॅस चे वितरण होत असल्याची माहिती

पीएनजी गॅसची लाईन असलेल्या ठिकाणी 80 टक्के घरामध्ये अद्याप एलपीजीचा वापर

पहिल्या टप्प्यात दोन लाख घरामध्ये पीएनजी चा वापर सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आला आहे त्यामध्ये चार लाख सिलेंडरची बचत होणार आहे

परिस्थितीमुळे गॅस सिलेंडर चे टंचाई निर्माण होऊ शकते त्यासाठी सहकार विभागाकडून पुढाकार घेण्यात आला आहे

अर्धनग्न आणि अंगाला तेल लावलेले चोरटा महाडच्या नाते परिसरात सीसीटीव्हीत कैद

महाड तालुक्यातील नाते गावात अर्धनग्न अवस्थेत अंगाला तेल लावलेला चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. CCTV मध्ये दिसणाऱ्या या चोरट्याबाबत अद्याप कोणीही पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. मात्र चोरट्याच्या अशा प्रकारच्या वावरामुळे परिसरात भितीचे वातावरण असून अशा चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होते आहे.

नागपूर तळेगाव मार्गावर कारंजा शहराजवळ भीषण अपघात

- लोखंडी रॉड आणि सळाख्यांचे बंडल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा नियंत्रण सुटून अपघात

- चालक आणि क्लीनर जखमी झाल्याची माहिती, नागरिकांनी आणि पोलिसांच्या साह्याने दोघांना बाहेर काढून रुग्णालयात केले दाखल

- महामार्गावरून करंजा शहराकडे जाणाऱ्या सर्विस रोड सुरुवातीलाच लोडे ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने पलटी खाल्ली

- या अपघातामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती तेच महामार्गावर लोखंडी सडाकांचे बंडल खाली पडल्याने वाहतुकीसाठी अडथळे निर्माण झाला होता

- स्थानिक नागरिकांनीही महामार्ग असलेले लोखंडी सडाकांचे बंडल बाजूला करत वाहतुकीस मार्ग दिला मोकळा करून.

आज रंगणार ६८ व्या महाराष्ट्र केसरी चा अंतिम सामना

पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे आयोजित ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार शिगेला

गादी आणि माती या दोन्ही विभागांतील उपांत्य फेरीचे निकाल जाहीर

किताबी गदेसाठीचे अंतिम चार मल्ल झाले निश्चित

गादी विभागातून सोलापूरचा जय पाटील आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात अंतिम सामना

माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीचा सिकंदर शेख यांची अंतिम फेरीत धडक

स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी’त रंगलेल्या स्पर्धेत शनिवारी ऐतिहासिक लढती

Maharashtra Live News Update: चाकणकरांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागितला, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रुपाली चाकणकर यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यांचे आणि भोंदूबाबा अशोक खरात यांच्यातील संबंधांवरून लोकांमध्ये वातावरण चांगले नाही. या भोंदू बाबाने अनेक महिलांना फसवले आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितले, असे आठवले म्हणाले. या प्रकरणात अनेक मोठ्या नेत्यांची नावे समोर येत आहेत, असे विचारता, त्यांनी याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, असे उत्तर दिले. चंद्रपुरात आज आईसाहेब बहुद्देशीय संस्थेच्या वतीने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला आठवले उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी चाकणकर प्रकरणी भाष्य केले.

पुणे - मिळकतकराचा भरणा ३१ मार्च पर्यंत सुरू

मिळकतकराचा भरणा करणेकामी नागरी सुविधा केंद्र ३१ मार्च पर्यंत साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील सुरु असणार

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना मिळकतकर भरणा करणे सुकर व्हावे यासाठी निर्णय

विविध क्षेत्रिय कार्यालय व संपर्क कार्यालयांतर्गत नागरी सुविधा केंद्र (CFC) चालू करण्यात आले आहेत

२०२५-२६ हे आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे वर्ष अखेरीस मिळकतकर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होते

या कालावधीत मिळकतकराचा भरणा करणे नागरिकांना सोयीस्कर होण्यासाठी पुणे महापालिकेचा निर्णय

नागरी सुविधा केंद्र २९ मार्च पर्यंत सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ४ पर्यंत सुरु रहाणार

३० व ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.४५ ते रात्री ८.०० वाजेपर्यंत केंद्र सुरू राहणार

ज्यांनी मिळकतकराचा भरणा अद्यापपर्यंत केलेला नाही त्यांना महापालिकेचे आवाहन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com