Gold Rate : गुढीपाडवा धमाका! २४ तासांत सोनं ४ हजारांनी स्वस्त, तर चांदी १३ हजारांनी स्वस्त; पाहा आजचे दर

Jalgaon gold price today : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं ४ हजारांनी आणि चांदी १३ हजारांनी स्वस्त. ग्राहकांची दागिन्यांच्या दुकानात गर्दी, जाणून घ्या आजचे ताजे दर.
Jalgaon gold price today
Jalgaon gold price today Saam tv marathi
Published On

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

Gudi Padwa gold price 24k : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढी पाडव्याचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळत आहे. हिंदू संस्कृतीत या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज नवीन वस्तू किंवा सोन्या-चांदीची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. याच मुहूर्तावर सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला. मागील २४ तासांत जळगावच्या सुवर्णमार्केटमध्ये सोन्याच्या दरात ४ हजारांची घसरण झाली. तर चांदीच्या किंमतीमध्येही मोठी कपात नोंदवण्यात आली.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात प्रति तोळा ४,००० रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलो १३,००० रुपयांची मोठी घट नोंदवण्यात आली. या घसरणीमुळे पाडव्याच्या दिवशी दागिन्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. आज सोन्याचे दर जीएसटीसह १,५७,०७५ रुपयांवर, तर चांदीचे दर जीएसटीसह २,५३,३८० रुपयांवर पोहोचले आहेत.

Jalgaon gold price today
Gold Rate Today : पाडव्याला मुंबई-पुण्यात सोनं झालं स्वस्त, प्रति तोळा २७८० रूपयांची घसरण, वाचा 22k,24k गोल्डचे ताजे दर

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत युद्धामुळे मोठी खळबळ सुरू आहे. अमेरिका आणि इराणमधील युद्धाच्या वणव्यामुळे २० दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. जागतिक पातळीवरील या अनिश्चिततेचा थेट फटका भारतीय बाजारपेठेलाही बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने सामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात तब्बल 70 हजार तर चांदीमध्ये तब्बल दीड लाख रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. वर्षभरात डोनाल्ड ट्रम्प यांचं टेरीफ संदर्भातलं धोरण, रशिया युक्रेन युद्ध याबरोबरच वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्या-चांदीच्या दरावर मोठा परिणाम झाला.

Jalgaon gold price today
Maharashtra politics : ... तर फडणवीस सरकार कोसळेल, खासदारानं ५६ व्हिडिओचा केला उल्लेख, राज्यात खळबळ

दर वाढलेले असले तरी गुढीपाडव्याला सोनं खरेदी केल्याने घरात वर्षभर बरकत राहते, अशी नागरिकांची श्रद्धा आहे. त्यामुळे सोनं महाग असलं तरी मुहूर्तासाठी आम्ही थोड्या प्रमाणात का होईना, पण खरेदी करणारच, अशी भावना अनेक ग्राहकांनी व्यक्त केली आहे. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे अनेकांनी दागिन्यांऐवजी सोन्याची नाणी किंवा लग्नसराईसाठीची आगाऊ बुकिंग करण्यावर भर दिला आहे.

Jalgaon gold price today
HDFC Bank च्या चेअरमनचा अचानक राजीनामा, धक्कादायक कारण आले समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com