Maharashtra politics : ... तर फडणवीस सरकार कोसळेल, खासदारानं ५६ व्हिडिओचा केला उल्लेख, राज्यात खळबळ

Kharat case Maharashtra details : खरात प्रकरणात ५६ व्हिडिओ समोर आल्यास फडणवीस सरकार कोसळेल, असा संजय राऊत यांचा दावा. मोठ्या नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप, महाराष्ट्रात खळबळ.

Maharashtra Political Crisis : भोंदूबाबा खरात प्रकरणात पोलिसांनी व्हिडिओ बाहेर आणले तर महाराष्ट्रातील सरकार कोसळेल असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. खरात याचे ५६ व्हिडिओ पोलिसांकडे आहेत, त्यामध्ये भाजपच्या बड्या नेत्यांचाही समावेश असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. जर पोलिसांनी हे व्हिडिओ समोर आणले तर राज्यातील सरकार कोसळेल असे ते म्हणाले आहे. अमेरिकेतील एपस्टिनपेक्षाही हे प्रकरण मोठं आणि गंभीर असल्याचा दावा राऊतांनी केला आहे.

बोंदू बाबा खरात प्रकरणात शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजप आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. खरात यांच्या मोबाईलमधील व्हिडिओ आणि फोटो समोर आले, तर महाराष्ट्रातील सरकार कोसळेल, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, "ज्या प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो माझ्यासमोर आले आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते की हे प्रकरण 'जेफ्री एपस्टीन' प्रकरणापेक्षाही भयंकर आहे. माझ्याकडे अनेक व्हिडिओ आणि फाईल्स आल्या आहेत, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी पक्षातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com