सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा, दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार अन्...

Son In Law Marries Mother In Law Shocking Case In Kanpur: कानपूरमध्ये सासू आणि जावई यांनी घरातून पळून जाऊन कोर्ट मॅरेज केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून समाजात मोठी चर्चा रंगली आहे.
A controversial couple from Kanpur claims they married by choice after eloping, sparking widespread debate on social media.
A controversial couple from Kanpur claims they married by choice after eloping, sparking widespread debate on social media.saam tv
Published On

कानपूर: नातेसंबंधांना काळिमा फसणारी धक्कादायक घटना उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. एका सासूने स्वतःच्या जावयालाच जीवनसाथी बनवल्याची घटना घडली आहे. हा प्रकार अकबरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. मिळालेल्या महितीनुसार, जावई आपल्या सासूसोबत घरातून निघून गेला आणि दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केलं. लग्नानंतर या दोघांचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपलं नातं स्वीकारण्याची आणि लोकांनी आशीर्वाद द्यावेत अशी विनंती केली आहे.

A controversial couple from Kanpur claims they married by choice after eloping, sparking widespread debate on social media.
Vande Bharat sleeper : मुंबई-पुणे-बंगळुरू वंदे भारतचा मार्ग ठरला, तिकिटाच्या किंमतीही समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

सासू आणि जावई यांच्यात मागच्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंब आणि समाजाचा विचार न करता त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि विवाहबंधनात देखील अडकले. व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की आम्ही स्वतःच्या इच्छेने लग्न केलं असून आता पुढील आयुष्य एकत्र घालवणार असल्याचे ते म्हणाले.

A controversial couple from Kanpur claims they married by choice after eloping, sparking widespread debate on social media.
Earthquake Video : भूकंपाने जमीन थरथरली; १३ इमारती कोसळल्या, थरारक व्हिडिओ

अलीगढमध्येही घडली होती अशीच घटना

यापूर्वी अलीगढ जिल्ह्यातही अशीच एक घटना समोर आली होती. एका महिलेनं स्वतःच्या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. त्यावेळी मुलीच्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, पत्रिकाही वाटले गेले होते. मात्र आईच होणाऱ्या जावयासोबत फरार झाली. काही दिवसांनी दोघे पोलीस ठाण्यात हजर झाले आणि एकत्र राहू लागले. मात्र, सुमारे वर्षभरानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com