Earthquake Video : भूकंपाने जमीन थरथरली; १३ इमारती कोसळल्या, थरारक व्हिडिओ

china earthquake 13 buildings collapse two dead : दक्षिण चीन भूकंपाने हादरला. ग्वांग्शी प्रदेशातील लिवझो शहरात शक्तीशाली भूकंपामुळे १३ इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाचा तडाखा आणि पूरस्थितीचा सामना करणाऱ्या चीनला भूकंपाने हादरवलंय. दक्षिण चीनमध्ये सोमवारी ५.२ तीव्रतेचा शक्तीशाली भूंकप झाला. यात २ जणांचा मृत्यू झाला. तर लिवझो शहरातील १३ इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या.

मुसळधार पाऊस, वादळ आणि त्यानंतर आता भूकंप असा तिहेरी तडाखा चीनला बसला आहे. दक्षिण चीनच्या ग्वांग्शी प्रदेशातील लिवझो शहरात सोमवारी पहाटे ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाच्या हादऱ्यांमुळं १३ इमारती कोसळल्या. तसेच दोघांचा मृत्यू झाला, एक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे. बाधित भागात मदत आणि बचावकार्य हाती घेण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com