Viral Video: मांडीवर मांडी अन् घट्ट मिठी, धावत्या रेल्वेत कपलचे अश्लील कृत्य; नक्की काय घडलं?

Shocking Train Video: रेल्वेमधून प्रवास करताना अनेक अजब-गजब गोष्टी पाहायला मिळतात. पण यावेळी एका कपलने सर्व मर्यादा ओलांडत सार्वजनिक ठिकाणी रोमान्स केल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.
Shocking Viral Video
Shocking Viral Video Saam Tv News
Published On

ट्रेन असो किंवा लोकल प्रवास करताना आश्चर्यकाराक गोष्टी आपल्याला दिसत असतात. कधी भांडण तर कधी हाणामारी होते. याचे व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल होतात. पण सध्या सोशल मीडियात कपलचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कपलचा रेल्वेच्या डब्यामध्येच रोमान्स सुरू आहे. प्रवाशांसमोरच त्यांनी निर्लज्जपणाची मर्यादा ओलांडली. सध्या व्हिडिओ व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Shocking Viral Video
गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, रेल्वे कोच दिसत आहे. स्लीपर बर्थमध्ये एक जोडपं दिसत आहे. दोघेही बर्थवर बिलगून झोपलेले आहेत. दोघांचा रोमान्स सुरू आहे. आक्षेपार्ह कृत्य पाहून प्रवाशांना राग अनावर होतो. त्यांनी टीटीईला याची माहिती दिली. टीटीई त्या जोडप्याजवळ जातात. तसेच दोघांशी बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच हे कृत्य आक्षेपार्ह आहे हे थांबवा, असं म्हणताना दिसत आहे.

Shocking Viral Video
'अल्लाहू अकबर...विमानात बॉम्ब आहे' प्रवाशानं घातला गोंधळ, VIDEO समोर; विमानात नेमकं काय घडलं?

व्हिडिओमध्ये काही वेळानं एक मुलगी तिच्या कुटुंबासह कपलसमोरील पुढच्या सीटवर बसते. परंतु तरीही कपलला काहीही फरक पडत नाही. त्यांचा रोमान्स सुरूच असतो. दरम्यान, हे प्रकरण सुरू असताना एका तरूणीनं हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद केलेला आहे. तसेच सोशल मीडियात व्हायरल केला आहे.

Shocking Viral Video
एकनाथ खडसेंवर मुलाच्या हत्येचा आरोप, निखिलसोबत त्यावेळी काय झालं होतं? रोहिणी खडसेंनी सगळंच सांगितलं

व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला. काही नेटकऱ्यांनी या जोडप्याची खिल्ली उडवली. तर, काहींनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com