'अल्लाहू अकबर...विमानात बॉम्ब आहे' प्रवाशानं घातला गोंधळ, VIDEO समोर; विमानात नेमकं काय घडलं?

Passenger Screams Bomb Threat: अमेरिकेतील इझीजेटच्या विमानात एका प्रवाशाच्या विचित्र कृतीमुळे प्रचंड गोंधळ उडाला. इझीजेटच्या विमानातील या व्यक्तीनं अचानक विमानात बॉम्ब असल्याची ओरडाओरड केली.
Passenger Screams Bomb Threat
Passenger Screams Bomb ThreatSaam Tv News
Published On
Summary

EasyJet विमानात ४१ वर्षीय व्यक्तीनं बॉम्ब असल्याची खोटी घोषणा केली.

घोषणांमध्ये 'अल्लाहू अकबर' आणि 'ट्रम्पचा मृत्यू होवो'चा समावेश होता.

एका प्रवाशाने आरोपीला पकडून शांत केले, विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली.

पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून कोणताही स्फोटक सापडले नाही.

अमेरिकेतील इझीजेटच्या विमानात एका प्रवाशाच्या विचित्र कृतीमुळे प्रचंड गोंधळ उडाला. इझीजेटच्या विमानातील या व्यक्तीनं अचानक विमानात बॉम्ब असल्याची ओरडाओरड केली. त्यानंतर त्यानं 'डोनाल्ड ट्रम्प मृत्यू होवो', अशा घोषणा देत तीन वेळा 'अल्लाहू अकबर'चा नारा दिला. याचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना इझीजेटच्या EasyWE609 विमानात घडली. हे विमान लंडनच्या ल्युटन विमानतळावरून स्कॉटलंडच्या ग्लासगोला जात होते.

व्हायरल व्हिडिओमध्ये नक्की काय?

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ४१ वर्षीय व्यक्ती अचानक उभा राहून घोषणा देऊ लागतो. तो सुरूवातीला हात हलवून मोठ्यानं ओरडू लागतो...विमान थांबवा.. त्यात बॉम्ब आहे. तो लवकरात लवकर शोधा. तो एवढ्यावरच थांबत नाही, यानंतर तो म्हणतो, अमेरिका.. डोनाल्ड ट्रम्पचा मृत्यू. यानंतर तो तीन वेळा अल्लाहू अकबरचा नारा देतो.

Passenger Screams Bomb Threat
ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा, अधिवेशन तापणार; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार | Operation Sindoor

एका प्रवाशाने ‘द सन’ या वृत्तपत्राला सांगितले की, तो व्यक्ती शौचालयातून बाहेर आला. अचानक आक्रमक झाला. त्याने "अल्लाहू अकबर"ची घोषणा दिली आणि म्हणाला की, त्याला विमानात बॉम्ब सापडला आहे. यानंतर त्याने केबिन क्रू सदस्यांना ढकलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी वाद घालण्याचा निर्णय घेतला.

घटनेदरम्यान एका प्रवाशाने त्या इसमाला मागून पकडले आणि जमिनीवर ढकलून दिले. यानंतर तो व्यक्ती शांत झाला. त्यानंतर विमानाची आपत्कालीन लँडिंग ग्लासगो विमानतळावर करण्यात आली. पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेतले.

Passenger Screams Bomb Threat
गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

तपासात ही बॉम्ब धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस आणि इझीजेट कंपनीने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, वेळेत योग्य पावले उचलण्यात आली आहेत. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून प्रवाशी सुरक्षित आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com