Viral Video: बाइकवर फिरताना अचानक सिंह आडवा आला, तरुणांची चांगलीच तंतरली; VIDEO तुफान व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात गुजरात राज्यातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात एका वस्तीत सिंह वावरताना दिसून आलेला आहे.
Viral Video
Shocking VideoSaam Tv
Published On

सोशल मीडियावर कायम आपल्याला अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळतात. कधी मनोरजंनाचे तर कधी भावूक करणारे. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून व्हायरल व्हिडिओ काही अनोखे व्हिडिओ पाहण्यास मिळतात. जे व्हिडिओ पाहून अक्षरशा: अंगाचा थरकाप उडतो. ज्या व्हिडिओ भरवस्तीत बिबट्या आणि वाघ शिरलेला असतो. अशातच सोशल मीडियावर गुजरातमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे भरवस्तीत सिंह आलेला दिसून येत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक रहिवासी परिसर दिसून येत आहे. त्यानंतर व्हिडिओ तुम्हाला बंगलो दिसून येत आहे. जिथे काही वेळात एक कुत्र्यासारखा प्राणी चालत येताना दिसून येत आहे. व्हिडिओत(Video) पुढे पाहिले तर कुत्र्यासारखा दिसून येणारा प्राणी चक्क महाकाय सिंह आहे. जो भरवस्तीत चालत जाताना दिसत आहे. काही वेळात त्याच रस्त्यावर एक दुचाकीस्वाक येतो आणि सिंहाला पाहून ते दुचाकी तिथेच सोडून पळून जातात. व्हिडिओच्या शेवटी सिंह एका बाजूने जाताना दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. जो की एक्स प्लॅटफॉर्मवरील ''@RkhulasaC'' या पेजवर ८ ऑगस्ट रोजी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''#गुजरातमधील सोमनाथ येथील एका निवासी भागात बाईक चालवणारे लोक सिंहासमोर आले. सिंह रस्त्यावरून जात असल्याचे पाहून लोकांनी आपल्या दुचाकी तेथेच टाकून जीव वाचवण्यासाठी पळ काढला. याचा #CCTV व्हिडिओही समोर आला आहे'' असे लिहिण्यात आलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Video
वेडा झालाय का? चक्क वाघाच्या पाठीवर बसून फेरफटका, पाकिस्तानमधला Video Viral, नेटकऱ्यांमध्ये संताप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com