Shocking: भयंकर! ६५ वर्षीय महिलेची बलात्कार करून हत्या, आरोपीने त्याच ठिकाणी केली आत्महत्या

Karnataka Crime: कर्नाटकातील बंगळुरूमध्ये भयंकर घटना घडली. ६५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. आरोपीने त्याच ठिकाणी आयुष्य संपवलं. या घटनेमुळे बंगळुरूमध्ये खळबळ उडाली.
Shocking: भयंकर! ६५ वर्षीय महिलेची बलात्कार करून हत्या, आरोपीने त्याच ठिकाणी केली आत्महत्या
Karnataka CrimeSaam Tv Marathi
Published On

Summary -

  • बंगळुरूमध्ये ६५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून हत्या

  • आरोपी घरातील नोकर असल्याची माहिती

  • गुन्हा केल्यानंतर आरोपीने आत्महत्या केली

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास केला सुरू

कर्नाटकमध्ये ६५ वर्षांच्या महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. महिलेसोबत दुष्कर्म करून तिची हत्या केल्यानंतर आरोपीने देखील आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना बंगळुरू शहरातील मीको लेआऊट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बलात्कार आणि हत्या करण्यात आलेली ६५ वर्षीय महिला ज्या बिल्डिंगमध्ये राहत होती त्याच बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर तिची २७ वर्षीय मुलगी राहत होती. पण ही घटना घडली याची तिला काहीच माहिती नव्हती. रविवारी पहाटे घटना घडली असून घरातील नोकाराने हे भयंकर कृत्य केले. आरोपीने महिलेवर आधी बलात्कार केला. त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर त्याने देखील आयुष्य संपवलं.

Shocking: भयंकर! ६५ वर्षीय महिलेची बलात्कार करून हत्या, आरोपीने त्याच ठिकाणी केली आत्महत्या
Crime: ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, २४ वर्षीय तरुणाचं भयंकर कृत्य; घरासमोरून अपरहण केलं, नंतर...

आरोपी देवराजू (५० वर्षे) तमिळनाडूच्या होसूर येथे राहत होता. तो गेल्या ८ वर्षांपासून ६५ वर्षीय महिलेच्या घरामध्ये नोकर म्हणून काम करत होता. घरातील सर्व कामं तो करायचा. तो याच बिल्डिंगमधील इतर घरांमध्ये देखील काम करायचा. देवराजूने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर तिची गळा आवळून हत्या केली. हत्या झालेल्या महिलेच्या मानेवर जखमा आढळून आल्या. गुन्हा केल्यानंतर आरोपीने भीतीपोटी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Shocking: भयंकर! ६५ वर्षीय महिलेची बलात्कार करून हत्या, आरोपीने त्याच ठिकाणी केली आत्महत्या
Crime: शरीरसंबंध ठेवताना बायकोनं नवऱ्याचा गळा चिरला; मृतदेहाजवळच भाच्यासोबत केले अश्लील कृत्य

हत्या करण्यात आलेल्या महिलेचा नवरा एका प्रसिद्ध कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतो. ही घटना घडली तेव्हा तो कामानिमित्त परदेशात गेला होता. रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास महिलेचा नवरा घरी परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घराचा दरवाजा उघडून जेव्हा तो बेडरूममध्ये गेला तेव्हा त्याची बायको जमिनीवर मृतावस्थेत पडलेली दिसून आली. तर नोकर देवराजू पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

Shocking: भयंकर! ६५ वर्षीय महिलेची बलात्कार करून हत्या, आरोपीने त्याच ठिकाणी केली आत्महत्या
Dombivli Crime: माझ्या मुलीकडे का बघतो? जाब विचारल्याने पोरीच्या वडिलांना मारलं, मद्यधुंद तरुणांचा हैदोस; VIDEO व्हायरल

हे पाहून महिलेच्या नवऱ्याला धक्का बसला आणि त्याने आरडाओरडा केला. तेव्हा त्याची मुलगी धावत आली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. वैद्यकीय आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर नेमकं काय घडलं हे कळेल. याप्रकरणी पोलिसांनी हत्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Shocking: भयंकर! ६५ वर्षीय महिलेची बलात्कार करून हत्या, आरोपीने त्याच ठिकाणी केली आत्महत्या
Crime News : संधी साधून तो थेट मुलीच्या घरात शिरला अन्...; ऑनलाईन गेममधील मैत्रीचं भयानक वास्तव आलं समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com