Crime: ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, २४ वर्षीय तरुणाचं भयंकर कृत्य; घरासमोरून अपरहण केलं, नंतर...

Bihar Crime : बिहारमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर २४ वर्षीय तरुणाने बलात्कार केला. घरासमोर खेळणाऱ्या या मुलीचे अपहरण करण्यात आले. निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली.
Crime: ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, २४ वर्षीय तरुणाचं भयंकर कृत्य; घरासमोरून अपरहण केलं, नंतर...
Bihar Crime Saam Tv
Published On

Summary:

  • बिहारच्या पाटणा जिल्ह्यात ही घटना घडली

  • 4 वर्षांच्या मुलीचे घरासमोरून अपहरण

  • आरोपीने निर्जनस्थळी नेऊन केला बलात्कार

  • पोलिसांनी 24 वर्षीय आरोपीला अटक केली

बिहारच्या पाटणामध्ये ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. बिहडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीचं अपहरण करून आरोपीने तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी २४ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Crime: ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, २४ वर्षीय तरुणाचं भयंकर कृत्य; घरासमोरून अपरहण केलं, नंतर...
Crime: शक्तीवर्धक गोळ्या घेऊन ठेवायचा शरीरसंबंध, त्रासाला कंटाळून महिलेने नवऱ्याला संपवलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या घराच्या अंगणात खेळत होती. त्याचवेळी गावात राहणारा २४ वर्षीय तरुण त्याठिकाणी आला. या तरुणाने चिमुकलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवत तिला सोबत नेले. त्याने चिमुकलीला एका निर्जनस्थळावर नेलं त्याठिकाणी त्याने तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. पीडितेची अवस्था पाहून पोलिसांनी तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पीडितेवर सध्या उपचार सुरू आहेत.

Crime: ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, २४ वर्षीय तरुणाचं भयंकर कृत्य; घरासमोरून अपरहण केलं, नंतर...
Crime News: ६ वर्षांच्या मुलीवर गँगरेप, रक्तबंबाळ अवस्थेत घरी आली अन्...; १० ते १४ वयोगटातील ३ मुलाचं भयंकर कृत्य

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता एलएसएल टीमने घटनास्थळी धाव घेतली. या टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आणि तपासणीसाठी पाठवून दिले. या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Crime: ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, २४ वर्षीय तरुणाचं भयंकर कृत्य; घरासमोरून अपरहण केलं, नंतर...
Mumbai Crime : रोहित शेट्टीच्या जीवाला धोका; मध्यरात्री घराबाहेर ६ राऊंड फायर, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com