Crime News: ६ वर्षांच्या मुलीवर गँगरेप, रक्तबंबाळ अवस्थेत घरी आली अन्...; १० ते १४ वयोगटातील ३ मुलाचं भयंकर कृत्य
Delhi Crime NewsSaam Tv

Crime News: ६ वर्षांच्या मुलीवर गँगरेप, रक्तबंबाळ अवस्थेत घरी आली अन्...; १० ते १४ वयोगटातील ३ मुलाचं भयंकर कृत्य

Delhi Crime News: ६ वर्षांच्या मुलीवर ३ मुलांनी सामूहिक बलात्कार केला. आरोपी १० ते १४ वयोगटातील आहेत. या घटनेमुळे दिल्ली हादरली. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं तर एकाचा शोध सुरू आहे.
Published on

Summary:

  • दिल्लीत ६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

  • १० ते १४ वयोगटातील ३ मुलांचं भयंकर कृत्य

  • या घटनेमुळे दिल्ली हादरली

  • मुलीची प्रकृती गंभीर आहे

दिल्लीमध्ये ६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. ३ अल्पवयीन मुलांनी या मुलीला नूडल्स देण्याच्या बहाण्याने सोबत नेत तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. आरोपी १० ते १४ वर्ष वयोगटातील आहेत. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर एक फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे दिल्ली हादरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील भजनपुरा भागात ही घटना घडली. १० , १३ आणि १४ वर्षांच्या मुलांनी ६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. घटनेच्या काही तासांपूर्वी पीडित मुलीला तिच्या वडिलांनी चॉकलेट देऊन घराबाहेर सोडले होते. त्यानंतर त्याठिकाणी तिन्ही आरोपी आले त्यांनी मुलीला नूडल्स देण्याचे आमिष दाखवत सोबत नेले. आरोपींनी पीडित मुलीला एका बिल्डिंगमध्ये नेले आणि त्याठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

Crime News: ६ वर्षांच्या मुलीवर गँगरेप, रक्तबंबाळ अवस्थेत घरी आली अन्...; १० ते १४ वयोगटातील ३ मुलाचं भयंकर कृत्य
Bhandara Crime: भंडाऱ्यात 'सैराट'ची पुनरावृत्ती, आंतरजातीय विवाहाचा राग, सासू अन् मेहुण्याने तरुणाला संपवलं

आरोपींनी पीडित मुलीचे हात बांधून आणि तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत घरी आली. रक्त वाहत असल्यामुळे तिचे कुटुंबीय घाबरले. सुरूवातील तिच्या कुटुंबीयांनी शेजारच्यांना मुलगी पडल्याचे सांगितले. पण नंतर त्यांनी शेजारी राहणाऱ्या १३ वर्षांच्या मुलाने आपल्या दोन मित्रांसोबत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले. मेडिकल रिपोर्टमधून समोर आले की, चिमुकली चालू शकत नाही. जास्त रक्तस्राव होत आहे. पीडित मुलगी उठून बसली तर तिला प्रचंड त्रास होत आहे.जेव्हा ती चालते किंवा खेळते तर रक्तस्राव होतो.

Crime News: ६ वर्षांच्या मुलीवर गँगरेप, रक्तबंबाळ अवस्थेत घरी आली अन्...; १० ते १४ वयोगटातील ३ मुलाचं भयंकर कृत्य
Crime: शक्तीवर्धक गोळ्या घेऊन ठेवायचा शरीरसंबंध, त्रासाला कंटाळून महिलेने नवऱ्याला संपवलं

पीडित मुलीच्या आईने सांगितले की, जेव्हा माझी मुलगी बसते तेव्हा तिला प्रचंड वेदना होतात. जेव्हा ती खेळते तेव्हा रक्तस्राव होतो. आरोपी मुलं माझ्या मुलाचे मित्र आहेत. माझ्या १४ वर्षांच्या मुलीचा मागच्या वर्षी मृत्यू झाला होता ' या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं तर तिसऱ्याचा शोध घेत आहेत.

Crime News: ६ वर्षांच्या मुलीवर गँगरेप, रक्तबंबाळ अवस्थेत घरी आली अन्...; १० ते १४ वयोगटातील ३ मुलाचं भयंकर कृत्य
Mumbai Crime : दादरमधील धक्कादायक घटना! बेडरूमच्या बाल्कनीतून उडी मारत महिलेने संपवलं आयुष्य, कारण आलं समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com