Shocking: ९ वीच्या विद्यार्थिनीचे अपरहण करून सामूहिक बलात्कार, मानसिक धक्क्यातून मुलीची आत्महत्या

Rajasthan Crime News: राजस्थानमध्ये नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर मानसिक धक्का बसलेल्या मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे राजस्थामध्ये खळबळ उडाली.
Shocking: ९ वीच्या विद्यार्थिनीचे अपरहण करून सामूहिक बलात्कार, मानसिक धक्क्यातून मुलीची आत्महत्या
Rajasthan Crime newsSaam Tv
Published On

Summary:

  • राजस्थानमध्ये शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार

  • दोन तरुणांनी अपहरण करून केलं भयंकर कृत्य

  • निर्जनस्थळी नेऊन आळीपाळीने केला बलात्कार

  • मुलीने मानसिक धक्क्यातून आत्महत्या केली

राजस्थानमध्ये शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर चिंतेत येऊन मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना राजस्थानच्या बिकानेरमध्ये घडली. शाळेमध्ये जाणाऱ्या मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर २ तरुणांनी आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेनंतर १६ वर्षीय मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेमुळे राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २२ जानेवारीला घडली. बिकानेर जिल्ह्यातील खाजूवाला पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावात ही घटना घडली. पीडित मुलगी शाळेमध्ये जाण्यासाठी निघाली होती. त्याचवेळी याच परिसरात राहणाऱ्या दोन तरुणांनी तिचे अपरहण केले. त्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. सामूहिक बलात्कारानंतर मानसिक धक्का बसल्यामुळे चिंतेत येत पीडित मुलीने विष प्राशन केले. तिची प्रकृती बिघडल्यामुळे कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. बुधवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Shocking: ९ वीच्या विद्यार्थिनीचे अपरहण करून सामूहिक बलात्कार, मानसिक धक्क्यातून मुलीची आत्महत्या
Shocking: ७ तरुणी अन् एक तरुण दोन फ्लॅटमध्ये नको त्या अवस्थेत सापडले, अश्लिल व्हिडीओ कॉल अन्...

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. यामधील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली तर दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Shocking: ९ वीच्या विद्यार्थिनीचे अपरहण करून सामूहिक बलात्कार, मानसिक धक्क्यातून मुलीची आत्महत्या
Shocking: मुंबईत स्पीकर अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान भयंकर घडलं; थरारक VIDEO समोर

पीडित मुलीच्या भावाने तक्रारीत सांगितले की, त्याची बहीण २२ जानेवारीला शाळेत जात होती. गावातील दोन तरुणाने रस्त्यात तिला अडवले आणि जबरदस्ती बाईकवर बसवून नेले. आरोपींनी तिला एका निर्जनस्थळी नेले. सर्वात आधी आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी पळून गेले. घरी आल्यानंतर तिने २३ जानेवारीला विष प्यायले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Shocking: ९ वीच्या विद्यार्थिनीचे अपरहण करून सामूहिक बलात्कार, मानसिक धक्क्यातून मुलीची आत्महत्या
Shocking : ४ तरुण अन् ४ तरुणी एकाच खोलीत नको त्या अवस्थेत; पोलिसांनी धाड टाकताच धक्कादायक प्रकार उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com