

गाझियाबादमध्ये दोन फ्लॅटमधून ऑनलाइन व्हिडिओ कॉल रॅकेटचा पर्दाफाश
७ तरुणी आणि १ तरुणाला पोलिसांनी अटक केली
स्ट्रिप चॅट वेबसाइटचा वापर करून बनावट आयडी तयार केल्याचा आरोप
मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये दोन फ्लॅटमध्ये घाणेरडं काम करणाऱ्या तरुणींना पोलिसांनी अटक केली. या तरुणी न्यूड व्हिडीओ कॉल करायच्या. या रॅकेटमध्ये ते अनेकांना अडकवायच्या. पोलिसांनी या दोन फ्लॅटवर छापा टाकला तेव्हा या तरुणी नको त्या अवस्थेत पकडल्या गेल्या. या प्रकरणी पोलिसांनी एक तरुण आणि ७ तरुणींना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या क्रॉसिंग्ज रिपब्लिक पोलिस ठाण्याच्याच्या हद्दीतील सेव्हियर स्ट्रीट मार्केटमधील दोन फ्लॅटमधून अश्लील व्हिडीओ कॉल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. स्ट्रिप चॅट नावाच्या वेबसाइटवर नग्न व्हिडीओ कॉलद्वारे या तरुणी अश्लील कृत्य करत होत्या. पोलिसांनी या फ्लॅटमधून लॅपटॉप, डेस्कटॉप आणि अश्लील साहित्य देखील जप्त केले आहेत.
एसीपी वेव्ह सिटी प्रियश्री पाल यांनी सांगितले की, पोलिसांना एका फ्लॅटमधून अश्लील व्हिडिओ कॉल करणाऱ्या टोळीची माहिती मिळाली होती. पथकाने सेव्हियर स्ट्रीट मार्केटमधील फ्लॅट क्रमांक ६१२ वर छापा टाकला. या छाप्यादरम्यान, महिला आणि तरुणी अश्लील कृत्ये करताना आणि व्हिडिओ कॉलवर त्यांचे शरीर काढताना दिसल्या. दुसऱ्या बाजूला स्ट्रिप चॅट नावाच्या वेबसाइटद्वारे इतर लोक एकमेकांशी कनेक्ट झाले होते. दुसऱ्या फ्लॅटमध्ये, ६०१ खोलीमध्ये इतर महिला आणि तरुणी देखील व्हिडिओ कॉलिंग करत होत्या. पोलिसांनी त्या सर्वांना अटक केली.
घटनास्थळावरून चार सीपीयू, चार डेस्कटॉप, दोन यूपीएस, चार कीबोर्ड, तीन वाय-फाय राउटर, दोन लॅपटॉप, तीन लाईट, दोन लाईट स्टँड, तीन वेब कॅम, सहा माऊस, दोन एक्सटेंशन बोर्ड, आठ कनेक्शन केबल्स, तीन आक्षेपार्ह इलेक्ट्रॉनिक खेळणी इत्यादी वस्तू जप्त करण्यात आल्या. पोलिस चौकशीदरम्यान आरोपींनी कबूल केले की, त्यांनी वेबसाइटचा वापर करून त्यांची ओळख लपवून इतर नावांनी बनावट आयडी तयार केले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.