Crime News : धक्कादायक! पत्नीच्या टोमण्याने खचला, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Meerut Crime News : मेरठमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने पत्नीच्या मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुसाईड नोटमध्ये पत्नी व सासरच्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Crime News : धक्कादायक! पत्नीच्या टोमण्याने खचला, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
Meerut Crime News Saam Tv
Published On
Summary
  • स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची मेरठमध्ये आत्महत्या

  • पत्नीने फोनवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप

  • सुसाईड नोटमध्ये पत्नी व सासरच्यांची नावे

  • पोलिसांकडून गुन्हा दाखल; प्रकरणाचा तपास सुरू

पत्नीच्या टोमण्याला कंटाळून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे. सदर घटना मेरठ मध्ये घडली आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्येपूर्वी तरुणाने पत्नीला फोन करून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. मात्र तिने त्याला तू मरून जा असे म्हटले. त्यानंतर मात्र तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरातून आणि कुटुंबातून हळहळ व्यक्त केली जाते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव जितेंद्र चौहान असे आहे. मूळचा मुंडली येथील रहिवासी असलेला जितेंद्र हा सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशन परिसरातील सुभाष नगर येथे राहत होता. त्याची मोठी बहीण रश्मी ही सीतापूर क्राइम ब्रांचमध्ये महिला कॉन्स्टेबल आहे. दुसरी बहीण शिक्षिका आहे.

Crime News : धक्कादायक! पत्नीच्या टोमण्याने खचला, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
Sunday Mega Block : विकेंडला घराबाहेर फिरायला जात असाल तर थांबा; 'या' मार्गावर रविवारी असणार मेगा ब्लॉक, वाचा वेळापत्रक

जितेंद्रने २०२२ मध्ये मुरादाबादमधील कटघर येथील रहिवासी सोनल चौहानशी लग्न केले. पतीशी झालेल्या वादामुळे सोनल तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलाला घेऊन तिच्या आईवडिलांच्या घरी निघून गेली. जितेंद्रने तिला अनेक वेळा फोन करून परत येण्याचा आग्रह केला, पण तिने नकार दिला. शुक्रवारी व्हिडिओ कॉल दरम्यान जितेंद्रने सोनलला पंख्याला बांधलेला दुपट्टा दाखवला आणि तिला सांगितले की, जर ती तिच्या आईवडिलांच्या घरून परतली नाही तर, तो आत्महत्या करेल.

Crime News : धक्कादायक! पत्नीच्या टोमण्याने खचला, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
Shocking : हॉट आहेत का? ... मैत्रिणीचे कपडे बदलताना व्हिडिओ काढून प्रियकराला पाठवले; इंजिनीअरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये धक्कादायक प्रकार

सोनल म्हणाली, मर, पण मी माझ्या सासरच्या घरी येणार नाही. यानंतर जितेंद्रने आत्महत्या केली. सोनलने व्हिडिओ कॉलचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो जितेंद्रचा मोठा भाऊ धर्मेंद्रला पाठवला. धर्मेंद्र यांना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर सोनलचा मेसेज दिसला. ते लगेच घरी पोहोचले. जितेंद्रच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. नातेवाईकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना जितेंद्रचा मृतदेह पंख्याला बांधलेल्या फाशीला लटकलेला आढळला.

Crime News : धक्कादायक! पत्नीच्या टोमण्याने खचला, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
Shocking : नागपूर हादरलं! १० वीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

त्याच्या सुसाईड नोटमध्ये त्याने त्याची पत्नी आणि सासरच्यांवर त्याचा छळ केल्याचा आरोप केला होता. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच सोनल तिच्या कुटुंबीयांसह तिच्या सासरच्या घरी पोहोचली. जितेंद्रला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल त्याचं वडिलांनी सोनल, मेहुणी सनी, सासू ममता आणि सासरे विनय चौहान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com