Mumbai Crime: मालाड रेल्वे स्थानकावर प्रोफेसरची हत्या, नेमकं लोकलमध्ये काय घडलं? घटनेचा थरारक VIDEO समोर

Malad Railway Station CCTV Video: मुंबईतल्या मालाड रेल्वे स्थानकावर प्रोफेसरची हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी घडली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे.
Mumbai Crime: मालाड रेल्वे स्थानकावर प्रोफेसरची हत्या, नेमकं लोकलमध्ये काय घडलं? घटनेचा थरारक VIDEO समोर
Malad Railway Station CCTV VideoSaam Tv
Published On

Summary -

  • मालाड रेल्वे स्थानकावर प्रोफेसरची धारदार शस्त्राने हत्या

  • लोकल ट्रेनमध्ये गर्दीत धक्का लागल्यावरून वाद वाढला

  • सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला २४ तासांत अटक

  • घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले

मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावर शनिवारी संध्याकाळी एका प्रोफेसरची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ओंकार शिंदेला अटक केली. मालाडच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ओंकारने आलोक सिंग यांची हत्या केली होती. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता. ही घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला २४ तासांच्या आत अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. धक्का लागल्याच्या कारणावरून ओंकारने आलोक सिंगची हत्या केल्याचे सांगितले जात आहे. ओंकार शिंदे हा लोकलमधून उतरतो आणि आतमध्ये उभ्या असलेल्या आलोकवर तो धारदार शस्त्राने हल्ला करतो. या हल्ल्यात आलोक सिंग गंभीर जखमी होतात. त्यानंतर ओंकर घटनास्थळावरून पळ काढतो हे सीसीटीव्ही फूटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.

प्रत्यक्षदर्शीने सांगतिले की, आरोपी ओंकार लोकलमध्ये गर्दी असताना सुद्धा सतत पुढे जाण्यासाठी ढकलत होता. त्यामुळे आलोक सिंग यांनी आक्षेप घेतला आणि समोर महिला उभी आहे असा दावा केला होता. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान संतप्त झालेल्या ओंकारने खिशातून धारदार चिमटा काढला आणि आलोक सिंग यांच्या पोटावर वार केले. या हल्ल्यात आलोक सिंग गंभीर जखमी झाले आणि प्लॅटफॉर्मवर रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना रेल्वे पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात नेले पण रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Mumbai Crime: मालाड रेल्वे स्थानकावर प्रोफेसरची हत्या, नेमकं लोकलमध्ये काय घडलं? घटनेचा थरारक VIDEO समोर
Crime: नालासोपारा हादरले! आईने पोटच्या १५ वर्षीय मुलीचा घेतला जीव, खलबत्ता डोक्यात घातला अन्...

या घटनेनंतर गर्दीचा फायदा घेत आरोपी ओंकार शिंदेंने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे मालाडे रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनेचा तपास सुरू करत सीसीटीव्ही तपासले. आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला होता. या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली. ओंकार शिंदे हा खेतवाडी परिसरातील कारखान्यात काम करत होता. तो दररोज मालाड ते चर्नीरोड असा लोकल प्रवास करायचा. आरोपीने हत्या करण्यात वापरलेले शस्त्र अद्याप सापडले नाही त्याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत.

Mumbai Crime: मालाड रेल्वे स्थानकावर प्रोफेसरची हत्या, नेमकं लोकलमध्ये काय घडलं? घटनेचा थरारक VIDEO समोर
Crime News : पैशाचा वाद टोकाला गेला, जिवाभावाच्या मित्रांनी कट रचला; निर्जनस्थळी बोलावले अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com