Mumbai local : मुंबई हादरली, लोकल स्टेशनवर प्राध्यपकाची हत्या, भरगर्दीत चाकूने सपासप केले वार

Western Railway Malad platform murder case : मुंबई लोकलमधील सुरक्षेतील गंभीर त्रुटी पुन्हा उघड झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील मालाड स्थानकावर किरकोळ वादातून एका प्रवाशाने कॉलेज प्राध्यापक आलोक सिंह यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केली.
Malad railway station
Malad railway station Saam TV Marathi
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

College professor stabbed to death at Malad railway station : मुंबई लोकलमधील सुरक्षेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील मालाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर लोकलमधून उतरताना झालेल्या किरकोळ वादातून एका प्रवाशाने धारदार चाकूने हल्ला करून दुसऱ्या प्रवाशाची हत्या केली. या घटनेत कॉलेजचे प्राध्यापक आलोक सिंह यांचा मृत्यू झाला आहे. (Mumbai local train security lapse knife attack)

हल्ला केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून फरार झाला असून, रेल्वे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, लोकल ट्रेनमध्ये धारदार शस्त्र घेऊन प्रवास कसा केला जातो, असा सवाल उपस्थित होत असून रेल्वे सुरक्षेवर तीव्र टीका होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आलोक सिंह हे विलेपार्ले स्थानकात धिम्या लोकलने मालाडकडे निघाले होते. मलाड स्थानकात उतरत असताना दरवाज्यात उभ्या असणाऱ्या प्रवाशासोबत वाद झाला. या किरकोळ वादातून दुसऱ्या तरुणाने त्यांच्या पोटात धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत आलोक सिंह यांना शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Malad railway station
काँग्रेस खासदाराच्या पुतण्याने धाडधाड गोळ्या झाडत बायकोची हत्या केली, त्यानंतर आत्महत्या केली

आलोक सिंह हे नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये गणित आणि सांख्यिकी शिक्षक म्हणून कार्यरत होते. शनिवारी ते विलेपार्लेहून बोरिवली लोकलमधून निघाले होते. संध्याकाळी ६.३० वाजता लोकल मालाडला पोहोचली. स्टेशनवर उतरताना लोकलच्या दारात उभे असणाऱ्या एका व्यक्तीबरोबर वाद झाला. त्यानंतर एका व्यक्तीने गर्दीमध्ये अलोक सिंह यांच्या पोटात चाकूने वार केला. अन् गर्दीतून पळून गेला.

Malad railway station
Train Blast: धक्कादायक! अर्ध्या रात्री RDX ने ट्रेन उडवण्याचा डाव, रेल्वे ट्रॅकवर भयंकर स्फोट, ट्रेन पटरी उद्ध्वस्त, इंजिन थोडक्यात....

हल्ला झाल्यानंतर जखमी अलोक यांना तात्काळ जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरण अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी अलोक यांच्या कुटुंबियांना आणि महाविद्यालयातील वरिष्ठांना मृत्यूबाबत माहिती दिली. पोलिसांकडून मालाड आणि मागील रेल्वे स्थानकांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

Malad railway station
Domestic dispute : संतापलेल्या नवऱ्याने धाडधाड गोळ्या झाडल्या, बायकोसह चौघांचा जागीच मृत्यू, नेमकं कारण काय ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com