

Congress MP Shaktisinh Gohil nephew murder suicide case : गुजरातमधील काँग्रेस खासदार शक्तीसिंग गोहिल यांचा पुतण्या आणि सूनेचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला चुकून गोळ्या झाडल्या गेल्याचे बोलले जात होते. पण पोलिसांच्या रिपोर्ट्सनुसार, शक्तीसिंह गोहिल यांनी आधी बायकोची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे, दोन महिन्यापूर्वीच त्यांचं थाटामाटत लग्न झालं होतं.
बुधवारी रात्री गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेस नेते आणि खासदार शक्तीसिंह गोहिल यांच्या पुतण्या आणि सुनेचा गोळीबारात मृत्यू झाल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. २ महिन्यांपूर्वी यशराज सिंह गोहिल याचं राजेश्वरी यांच्यासोबत थाटामाटात लग्न झाले होते. यशराज हा वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होता. यशराज सिंह गोहिल आणि त्याच्या पत्नीने आत्महत्या का केली? याची चर्चा सुरू झाली होती. यशराज सिंह गोहिल यानं पत्नीची हत्या केली होती. त्यानंतर मंदिरात स्वतःवर गोळी झाडली होती. पण यशराजच्या आईने चुकून गोळी झाडल्याचा दावा केला होता. दोघांमधील कोणतेही भांडण किंवा तणाव नसल्याची प्रतिक्रिया दिली होती.
यशराज सिंह यांच्याविरुद्ध सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) जयेश ब्रह्मभट्ट यांनी शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. फॉरेन्सिक आणि बॅलिस्टिक पुराव्यानंतर यशराज आणि त्याच्या पत्नीचं अपघाती निधन झालं नसल्याचे स्पष्ट होतेय. पोलिस उपायुक्त (झोन १) हर्षद पटेल म्हणाले की, परवानाधारक रिव्हॉल्व्हरमध्ये फक्त दोन गोळ्या होत्या आणि दोन्ही गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या गोळ्या अपघाताने झाडण्यात आल्या नव्हत्या असेही समोर आलेय.
रिव्हॉल्व्हर चुकून सुटला नव्हते असे एसपी ब्रह्मभट्ट यांनी दाखल केलेल्या हत्येच्या तक्रारीत म्हटले. ट्रिगर चालवण्यासाठी ताकदीची आवश्यकता असते आणि ती अनावधानाने दाबता येत नाही. त्यामुळेच यशराजसिंह गोहिलने पत्नी राजेश्वरीला मारण्याच्या उद्देशाने ट्रिगर दाबला आणि तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गोळी झाडली. त्यामुळेच तिचा मृत्यू झाला असावा, असे तपासात समोर आलेय.
यशराजसिंहने राजेश्वरीवर का गोळ्या झाडल्या? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. राजेश्वरीची हत्या केल्यानंतर यशराज यानं स्वत:ही आत्महत्या केल्याचे पुरावे असल्याचेही पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलेय. नोव्हेंबरमध्ये यशराज सिंह आणि राजेश्वरी यांचं थाटामाटात लग्न झाले होते. अवघ्या दोन महिन्यातच यशराज सिंहने पत्नीची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या करत आयुष्य संपवले. अहमदाबादमधील जजेस बंगलो रोडवरील एनआरआय टॉवरमधील पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.